एसआयटीकडून चौकशीसाठी आर्यन खानला समन्स

एसआयटीकडून चौकशीसाठी आर्यन खानला समन्स

एसआयटीकडून चौकशीसाठी आर्यन खानला समन्स

क्रूझ ड्रग्स प्रकरणाचा तपास करण्यासाठी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून (एनसीबी)स्थापन करण्यात आलेल्या विशेष चौकशी पथकाकडून (एसआयटी) या प्रकरणातील आरोपी अरबाज मर्चंट आणि आर्यन खान यांना चौकशीसाठी रविवारी समन्स बजावण्यात आले होते. त्यानुसार, अरबाज मर्चंट हा चौकशीसाठी एनसीबीच्या कार्यालयात रविवारी सकाळी हजर झाला. त्याची सुमारे नऊ तास चौकशी करण्यात आली. पण आर्यन खानने प्रकृती अस्वस्थतेचे कारण देत चौकशीसाठी हजर राहणे टाळले. सोमवारी सकाळी आर्यन खान चौकशीसाठी हजर राहणार असल्याचे कळते.

क्रूझ ड्रग्सप्रकरणी जबानी देण्यासाठी रविवारी सकाळी अरबाज मर्चंट आणि आर्यन खान यांना रविवारी सकाळी ११ वाजता एनसीबीच्या मुंबईतील कार्यालयात बोलवण्यात आले होते. त्यानुसार, अरबाज मर्चंट सकाळी एनसीबीच्या कार्यालयात हजर राहिला. त्याची रात्री उशिरापर्यंत जबानी घेण्यात आली. प्रकृती बरी नसल्याचे कारण देत आर्यन खानने मात्र चौकशीला जाणे टाळले.

जामीन देताना ज्या अटी ठेवण्यात आल्या होत्या, त्याचाच भाग म्हणून हे दोघे विशेष पथकासमोर हजर राहिले. दरम्यान, अधिकार्‍यांकडून जेव्हा जेव्हा आरोपींना चौकशीसाठी बोलावले जाईल तेव्हा त्यांना हजर राहणे अनिवार्य राहील, अशी अट जामीन देताना ठेवण्यात आली होती.

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला एनसीबीने ३ ऑक्टोबर रोजी ड्रग्स प्रकरणी अटक केली होती. मुंबईहून गोव्याला जात असलेल्या एका क्रूझवर अचानक छापा टाकण्यात आला होता. त्यानंतर जवळपास तीन आठवडे कोठडीत राहिल्यानंतर २८ ऑक्टोबर रोजी आर्यनची जामिनावर सुटका करण्यात आली.

First Published on: November 8, 2021 6:25 AM
Exit mobile version