राष्ट्रवादीच्या तिखट घोषणा; ‘मोदी सरकार हायहाय!’

राष्ट्रवादीच्या तिखट घोषणा; ‘मोदी सरकार हायहाय!’

'मोदी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या आदेशानुसार राज्यभर भाजप सरकारच्याविरोधात आंदोलन पुकारले जात असून मोदींच्या खोट्या आश्वासनांवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून टीका केली जात आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकवेळी मोदी सरकारने देशातील तरुणांना रोजगार देण्याचे आश्वासन केले होते. परंतु, या आश्वासनाची पूर्तता हवी तशी झालेली नाही, त्यामुळे मोदी ,सरकाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने मंगळवारी मुंबईत ‘जॉब दो’ आंदोलन केले. या आंदोलनात मुंबई महानगरातील पक्षाचे प्रदेश प्रवक्ते क्लाईड क्रास्टो,युवक अध्यक्ष अॅड निलेश भोसले, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष विजय वाडकर, दक्षिण मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष व्यंकटेश मानम, उत्तर मुंबई कार्याध्यक्षा फेहमिदा खान,दक्षिण मुंबई युवक अध्यक्ष सचिन नारकर,मुंबई युवक उपाध्यक्ष अमित हिंदळेकर, कुलाबा तालुकाध्यक्ष मनोज आंब्रे, मुंबई महिला सरचिटणीस स्वाती माने आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने सहभागी झाले होते.

पोलिसांनी घेतले कार्यकर्त्यांना ताब्यात

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने मुंबईमध्ये मंगळवारी सरकारच्याविरोधात ‘जॉब दो’ आंदोलन पुकारण्यात आले होते. यावेळी आंदोलकांनी मोदी सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. आंदोलकांनी घोषणाबाजी करुन बलार्ड पिअर आणि जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून सोडला. दरम्यान, पोलिसांनी आंदोलन करणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आणि पुरुष आंदोलकांना ताब्यात घेतले. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

राष्ट्रवादीच्या तिखट घोषणा

‘जॉब दो’, ‘जॉब दो मोदी सरकार जवाब दो’, ‘राष्ट्रवादीची एकच पुकार जॉब दो’, ‘ये आझादी झुठी है’, ‘ये सरकार बदलनी है’, ‘मोदी सरकार हाय हाय’, ‘युवाओ को जो काम न दे वो सरकार बदलनी है’, ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो’, अशा गगनभेदी घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज बलार्ड पिअर आणि जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून सोडला.


हेही वाचा – धनंजय मुंडे म्हणाले, ‘हा मुंडे साहेबांचा अपमान’

First Published on: February 12, 2019 4:40 PM
Exit mobile version