लोकेश चंद्रा बेस्टचे नवे महाव्यवस्थापक

लोकेश चंद्रा बेस्टचे नवे महाव्यवस्थापक

लोकेश चंद्रा बेस्टचे नवे महाव्यवस्थापक

सामान्य प्रशासन विभागाचे सचिव लोकेश चंद्रा यांची बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक म्हणून नेमणूक झाली आहे. त्यांनी प्रभारी महाव्यवस्थापक पी. वेलरामू यांच्याकडून बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापक पदाचा कार्यभार स्वीकारला. ते स्थापत्य अभियांत्रिकी शाखेचे पदवीधर असून त्यांनी आय.आय.टी. (दिल्ली) मधून एम. टेक ही पदवी देखील संपादन केली आहे.

लोकेश चंद्रा यांच्याविषयी थोडक्यात

लोकेश चंद्रा हे १९९३ च्या तुकडीतील भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत. त्यांनी यापूर्वी केंद्रीय पोलाद मंत्रालयात संयुक्त सचिव पदावर काम केले असून केंद्रीय ऊर्जा मंत्रालयात संचालक म्हणूनही ते कार्यरत होते. त्याचप्रमाणे नागपुर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांचे जिल्हा अधिकारी म्हणून चंद्रा यांनी काम केले आहे आणि नागपुर महापालिकेचे आयुक्त, नागपुर सुधार विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष आणि सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अशा विविध महत्त्वाच्या पदांवर देखील ते कार्यरत होते.

एमएमआरडीए आयुक्तपदी श्रीनिवास 

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या आयुक्तपदी गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव एस. व्ही. आर. श्रीनिवास यांची नियुक्ती झाली आहे. तर वन विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर यांची गृहनिर्माण विभागात बदली करण्यात आली आहे. तर सिकॉमचे व्यवस्थापकीय संचालक बी. वेणुगोपाल रेड्डी यांची वन विभागाच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर महाराष्ट्र राज्य मत्स्यव्यवसाय विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सुमंत भांगे यांची बदली सामान्य प्रशासन विभागाच्या सचिव पदावर झाली आहे.


हेही वाचा – जोगेश्वरी येथील एसआरए बिल्डिंगमध्ये आग 


 

First Published on: June 4, 2021 5:55 PM
Exit mobile version