लालबागचा राजा मंडळाला खड्ड्यांप्रकरणी नोटीस; ३.६६ लाखांचा दंड

लालबागचा राजा मंडळाला खड्ड्यांप्रकरणी नोटीस; ३.६६ लाखांचा दंड

मुंबई : मुंबईत गणेशोत्सवात निर्विघ्नपणे पार पडला. मात्र गणेशोत्सवासाठी ‘लालबागचा राजा’ गणेशोत्सव मंडळाने मंडप परिसरात, रस्ते, पदपथ याठिकाणी बेकायदेशीरपणे १८३ खड्डे खोदले. त्यामुळे पालिकेच्या ‘ई’ विभाग कार्यालयाने मंडळाला प्रति खड्डा २ हजार रुपये याप्रमाणे ३ लाख ६६ हजार इतका दंड केला आहे. यासंदर्भात पालिकेने मंडळाला नोटीस बजावली आहे. माहितीच्या कायद्याच्या अधिकारात खड्ड्यांप्रकरणी पालिकेने मंडळावर केलेल्या कारवाईची माहिती प्राप्त झाली आहे. (Notice to Raja Mandal of Lalbagh regarding potholes 3 66 lakh fine)

मुंबईत विशेषतः लालबागचा राजा, खेतवाडी, परळ, भायखळा, गिरगाव आदी गणेशोत्सव मंडळांच्या गणपती बाप्पाला व सजावटीला बघायला लाखो गणेश भक्त दिवस – रात्र भेट देऊन , रांगेत उभे राहून दर्शन घेतात.

लालबागचा राजा मंडळाचा गणेशोत्सव दरवर्षी मोठ्या दिमाखात साजरा करण्यात येतो. याठिकाणी मोठया प्रमाणात भाविक गर्दी करतात. लालबागचा राजाला मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागदागिने, किमती वस्तू अर्पण करण्यात येतात. त्यामुळे लालबागचा राजाची शान कुछ औरच असते.

लालबागचा राजा या गणेशोत्सव मंडळाने दरवर्षीप्रमाणे यंदाही, गणेशोत्सवात भाविकांना रांगेतून बाप्पाचे दर्शन घेता यावे, यासाठी बॅरिकेड्स लावताना रस्त्यावर अनधिकृतपणे १८३ खड्डे खोदले. यामध्ये, पदपथावरिल ५३ खड्डे आणि रस्त्यावरील १५० असे एकूण १८३ खड्डे खोदण्यात आले. ही बाब महापालिकेच्या तपासणीत समोर आल. त्यामुळे पालिका प्रशासनाने, पालिकेच्या नियमानुसार प्रतिखड्डा २ हजार याप्रमाणे मंडळाला १८३ खड्डयांप्रकरणी ३ लाख ६६ हजार रुपये दंड केला आहे. त्यासाठी पालिकेने सदर मंडळाला नोटीस बजावली आहे.

गणेश मंडळाने ही रक्कम ‘ई’ वॉर्ड विभाग कार्यालयात तातडीने भरावी, असे निर्देशही प्रशासनाने दिले आहेत. याबाबत महेश वेंगुर्लेकर यांनी, ‘ई’ विभागाकडे २०२२ च्या गणेशोत्सवात लालबागचा राजा मंडळाने अनधिकृपणे पाडलेल्या खड्ड्यांची स्थिती आणि दंडाची माहिती अधिकारात मागितली असता प्राप्त माहितीवरून सदर माहिती इघड झाली आहे.


हेही वाचा – शौचालयात ठेवलेले अन्न खाताना खेळाडूंचा व्हिडीओ व्हायरल, संबंधित अधिकारी निलंबित

First Published on: September 20, 2022 9:43 PM
Exit mobile version