महात्मा गांधींविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट

महात्मा गांधींविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट

महात्मा गांधींविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट

पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर एका लेखकाने सोशल मीडियावर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविरोधात आक्षेपार्ह टीका केली आहे. त्यामुळे या लेखकाच्या विरोधात स्वाभिमानी संघटनेने अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. महेंद्र पाटील असं या लेखकाचं नाव आहे. अंबरनाथमधील ‘अंबर भरारी’ या व्हॉट्स अॅप ग्रुपमध्ये पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत चर्चा सुरू असतांना लेखक महेंद्र पाटीलने आक्षेपार्य टीका केली आहे. त्यामुळे त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे. या संदर्भात विकास सोमेश्वर , काँग्रेस नगरसेवक मिलिंद पाटील , स्वाभिमान संघटनेच्या महिला शहर अध्यक्ष रेणू सासे , सामाजिक कार्यकर्ते राहुल सोमेश्वर व त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात महेंद्र पाटील यांच्या विरोधात तक्रार केली असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

काय होती आक्षेपार्य टीका?

महेंद्र पाटीलने ‘अंबर भरारी’ या व्हॉट्स अॅप ग्रुपमध्ये महात्मा गांधी यांच्याविरोधात आक्षेपार्ह टीका केली आहे. त्यांनी ग्रुपमध्ये टाकलेल्या पोस्टमध्ये म्हटले होते की, ‘बरं झालं आज गांधीजी नाहीत. नाहीतर पाकिस्तानचा २०० किलो दारुगोळा नष्ट झाला. त्याची भरपाई द्यावी म्हणून उपोषणाला बसले असते.’ त्याचबरोबर ‘महेंद्र पाटील यांनी अशाप्रकारची पोस्ट टाकून, गांधीजी एकप्रकारे पाकिस्तानच्या बाजूने किंवा पाकिस्तानला समर्थन देणारे होते, असे भासविण्याचा प्रयत्न केलेला आहे’, असा आरोप स्वाभिमान संघटनेचे अंबरनाथ तालुका अध्यक्ष विकास सोमेश्वर यांनी केला. दरम्यान, या संदर्भात महेंद्र पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.


हेही वाचा – अंबरनाथ रेल्वे आरक्षण केंद्राबाहेर तिकिटांचा काळाबाजार

First Published on: February 22, 2019 9:35 PM
Exit mobile version