ओला-उबर चालकांचा आज मध्यरात्रीपासून पुन्हा संप!

ओला-उबर चालकांचा आज मध्यरात्रीपासून पुन्हा संप!

ओला-उबर चालकांचा आज मध्यरात्रीपासून पुन्हा संप!

मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईच्या ३० हजार ओला-उबर चालकांनी आज मध्यरात्रीपासून पुन्हा संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. दिवाळी निघून गेल्यानंतरही सरकारने त्यांच्या मागण्या मान्य न केल्यामुळे त्यांनी हा संप पुकारला आहे. दिवाळी अगोदरही त्यांनी १२ दिवसांचा संप पुकारला होता. त्यानंतर परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीत दिवाळी संपल्यानंतर १५ नोव्हेंबरपर्यंत त्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. परंतु, आज १७ नोव्हेंबर उजाडून गेल्यानंतरही सरकारकडून चालकांच्या मागण्यांवर कुठल्याही प्रकारची हालचाल झालेली दिसत नाही. त्यामुळे त्यांनी पुन्हा संप पुकारला आहे.

हेही वाचा – सलग आठव्या दिवशी ओला आणि उबर कॅब चालकांचा संप सुरु

सोमवारी चालकांचा विधान भवनवर मोर्चा

ओला आणि उबर चालकांनी १३ मागण्या मागितल्या आहेत. या मागण्यांसाठी त्यांनी गेल्यावेळीही १२ दिवस संप पुकारला होता. परंतु, त्यांना १५ नोव्हेंबर पर्यंच मागण्यांची पुर्तता करण्याचे आश्वासन सरकारकडून करण्यात आले होते. आता या १७ नोव्हेंबर उलटून गेल्यावरही मागण्या मान्य न झाल्यामुळे चालकांनी आज मध्यरात्री पासून संप पुकारला आहे. सोमवारी हिवाळी अधिवेशनचा पहिला दिवस आहे. त्यामुळे ओला चालकांनी विधान भवनवर मोर्चा घेऊन जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सोमवारी सकाळी १० वाजता भारतमाता ते विधान भवन असा मोर्चा निघणार असल्याची माहिती मराठी कामगार सेनेचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दिली आहे. त्याचबरोबर या मोर्चामध्ये ओला-उबर टॅक्सी चालकांचे कुटुंबीयही सहभागी होणार आहेत.


हेही वाचा – ओला उबर संपाने मुंबईकर ऑफलाइन

First Published on: November 17, 2018 9:30 PM
Exit mobile version