घरमुंबईसलग आठव्या दिवशी ओला आणि उबर कॅब चालकांचा संप सुरु

सलग आठव्या दिवशी ओला आणि उबर कॅब चालकांचा संप सुरु

Subscribe

आठ दिवसांपासून कंपनीच्या प्रशासनाकडून आंदोलनाची कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही. त्यामुळे कंपनीच्या विरोधात चालकांचा संताप व्यक्त होत आहे.

ओला आणि उबर कॅब चालकांचा आंदोलनाचा आज आठवा दिवस आहे. या ओला चालकांनी २२ ऑक्टोबरच्या दूपारपासून बेमूदत संप पुकारला होता. तेव्हापासून आज या संपाचा आठवा दिवस आहे. आज आंदोलकांनी ओलाच्या अंधेरी योथील कार्यालयापासून उबरच्या कुर्ला कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. सुरवातीला या कंपन्यांनी भरघोस नफ्याचे आमिष दाखवले. परंतु, सध्या योग्य मोबदला मिळू देत नसल्याचा आरोप आंदोलकांनी ओला आणि उबर कंपनीवर केला आहे.

‘प्रशासनाने अजूनही दखल घेतलेली नाही’

गेल्या आठ दिवसांपासून आंदोलन सुरु असूनही ओला आणि उबर कंपनीच्या प्रशासनाने चालकांची दखल घेतलेली नाही. त्यामुळे ओला चालकांकडून ओला आणि उबर कंपनीच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. सरकारने साध्या टॅक्सींसाठी २२ रुपये प्रति किलोमीटरचा दर ठरवला आहे. आम्ही ओला चालक प्रवाशींना एसीची देखील सुविधा देतो, परंतु कंपनीने प्रति किलोमीटर फक्त आठ ते दहा रुपये दर ठेवला आहे. शिवाय, पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. ओला चालकांची परिस्थितीही हलाखीची आहे. त्यामुळे आमचे आठ दिवसांपासून आंदोलन सुरु आहे, पण प्रशासन याकडे अजूनही लक्ष देत नसल्याची खंत ओला आणि उबर कॅब चालकांच्या महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे अध्यक्ष सुधीर भोसले यांनी व्यक्त केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ओला उबर संपाने मुंबईकर ऑफलाइन

Chetan Patilhttps://www.mymahanagar.com/author/chetan/
writer, poet, journalist, copy writer, theater artist
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -