फक्त १५ हजार १९ फेरीवाले परवान्यास पात्र

फक्त १५ हजार १९ फेरीवाले परवान्यास पात्र

एल्फिन्स्टन रोड रेल्वेस्थानकाच्या पूल दुर्घटनेनंतर फेरीवाल्यांचा प्रश्न एरणीवर आला होता. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून फेरीवाल्यांच्या विरोधात आंदोलने देखील करण्यात आली होती. या सर्व पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने फेरीवाल्यांसाठी नवे नियम लागू केले. यामध्ये त्यांना परवाना देण्याचा नवा नियम लागू करण्यात आला आहे. महापालिकेने दिलेल्या परवाना शिवाय, फेरीवाल्याने विक्रिसाठी बसणे अनधिकृत ठरणार आहे. त्यामुळे फेरीवाल्यांसाठी परवाने महत्त्वाचे असणार आहेत. परंतु, फेरीवाल्यांना परवाना देण्याच्या महापालिकेच्या प्रक्रियेत आतापर्यंत फक्त १५ हजार १९ फेरीवाले परवान्यास पात्र असल्याचे सिद्ध झाले आहे.

हेही वाचा – फेरीवाल्यांची दुकानदारी मुंबईकरांना त्रासदायक

४० हजार २३७ अर्जांची छाननी

सध्या मुंबईमध्ये ९९ हजार ४३४ फेरीवाले आहेत. या फेरीवाल्यांच्या जागा निश्चित करुन त्यांना परवाना देण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरु केली आहे. त्यानुसार या फेरीवाल्यांना महापालिकेने कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. आतापर्यंत ५१ हजार ७८५ फेरीवाल्यांनी कागदपत्रे आणि अर्ज महापालिकेकडे सादर केली आहेत. यापैकी ४० हजार २३७ अर्जांची छाननी महापालिकेने केली आहे. उर्वरीत कागदपत्रांची तपासणी प्रलंबित आहेत. परंतु, या तपासणीत फक्त १५ हजार १९ फेरीवाले परवान्यास पात्र असल्याचे समोर आले आहे. फेरीवाला समितीची मंजुरी मिळाल्यानंतर परवाने वितरीत करण्यात येतील, अशी माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

हेही वाचा – आमच्या मोर्चाचा राज ठाकरेंशी संबंध नाही – फेरीवाले

धार्मिक ठिकाणी फक्त पूजेच्या सामानाचे परवाने

अधिकृत फेरीवाल्यांसाठी जागा निश्चित करुन परवाना देण्यात येणार आहे. यासाठी धार्मिक मंदिर आणि अन्य धार्मिक स्थळांपासून १०० मीटर परिसरात फेरीवल्यांना परवाना देता येणार नाहीत. त्या परिसरात फक्त पूजेचे सामान विकण्याचे परवाना देण्यात येणार आहेत. मुंबई महापालिकेकडून मुंबई, उपनगर आणि पश्चिम उपनगरात फेरीवाल्यांसाठी ८५ हजार ८८१ जागा निश्चित केल्या आहेत. त्यासाठी फेरीवाला क्षेत्रनिश्चित धोरणात अधिवास दाखला बंधनकारक असणार आहे.


हेही वाचा – अतिक्रमण विभागावर दहशत कोणाची?

First Published on: December 3, 2018 2:39 PM
Exit mobile version