घरमुंबईआमच्या मोर्चाचा राज ठाकरेंशी संबंध नाही - फेरीवाले

आमच्या मोर्चाचा राज ठाकरेंशी संबंध नाही – फेरीवाले

Subscribe

फेरीवाल्यांना त्यांचा व्यवससाय शांतपणे करु द्या, तसंच घाटकोपर हिंगवाला मार्केटमधील ३१७ फेरीवाल्यांचं त्याचठिकाणी पुनर्वसन करा', या प्रमुख मागण्या यावेळी फेरीवाल्यांनी केल्या. 

आपल्या विविध मागण्यांसाठी आज मुंबईतील फेरीवाल्यांनी महापालिकेच्या मुख्यालयावर धडक दिली. शेकडोच्या संख्येत या मोर्चात सहभागी झालेले फेरीवाले मुख्यालयासमोर घोषणाबाजी करत होते. घोषणाबाजी सुरु असताना अचानक त्यांच्यातील एक फेरीवाला थेट मुख्यालयाच्या छतावर चढला. या प्रकारामुळे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ झाली. आजचा हा धडक मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज फेरीवाला संघाच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला होता. याबाबतची कुठलीही पूर्वसूचना प्रशासनाला देण्यात आली नव्हती. त्यामुळे अचानक मोठ्या संख्येनं आंदोलक मुख्यालयाकडे आल्याने, पोलिसांची तारांबळ उडाली. फेरीवाले भाजीच्या पाट्या आणि टोपल्या घेऊन मोर्च्यामध्ये सहभागी झाले होते. मोर्चातील महिला फेरीवाल्यांची संख्याही मोठी होती. यावेळी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय…’ असे नारे आंदोलनकर्त्यांनी लावले. ‘फेरीवाल्यांना त्यांचा व्यवससाय शांतपणे करु द्या, तसंच घाटकोपर हिंगवाला मार्केटमधील ३१७ फेरीवाल्यांचं त्याचठिकाणी पुनर्वसन करा’, या प्रमुख मागण्या यावेळी फेरीवाल्यांनी केल्या.

हे आंदोलन राज ठाकरेंविरुद्ध तर नाही?

सूत्रांनुसार, मुंबईच्या फेरिवाल्यांनी पालिका मुख्यालयावर नेलेल्या या धडक मोर्चाची कुणालाच पूर्व कल्पना नव्हती. मात्र, या मोर्चाच्या काहीवेळ आधीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे पालिका मुख्यालयामध्ये आले होते. मुख्यालयात येऊन राज यांनी आयुक्त अजोय मेहतांची भेट घेतली. त्यामुळे फेरीवाल्याचं हे आंदोलन राज ठाकरे यांच्या विरुद्ध तर नाही… असा सवाल उपस्थित करण्यात आला होता. मोर्च्याचा काहीवेळ आधीच राज पालिका मुख्यालयात गेल्यामुळे त्यांच्याच विरोधात हा मोर्चा आहे की काय, अशी चर्चा सुरु झाली होती. मात्र, यावर उत्तर देत राज ठाकरेंच्या आयुक्त भेटीचा आणि आमच्या मोर्च्याचा काहीही संबंध नसल्याचं फेरीवाल्यांनी सांगितलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -