पंकजा मुंडे यांचे ट्विट; शरद पवार यांना म्हणाल्या, ‘हॅट्स ऑफ’!

पंकजा मुंडे यांचे ट्विट; शरद पवार यांना म्हणाल्या, ‘हॅट्स ऑफ’!

पंकजा मुंडे-पालवे

नुकतेच पंकजा मुंडे यांनी ट्वीट करत शरद पवार यांचे कौतुक केले आहे. पंकजा मुंडे यांनी ट्वीटमध्ये शरद पवार यांचा उल्लेख करत त्यांच्याविषयी आदर व्यक्त केला आहे. या ट्वीटमध्ये पंकजा मुंडे म्हणाल्या की, कोरोनाच्या परिस्थितीत इतके दौरा, आपली बैठक आणि आपल्या काम करण्याच्या स्टॅमिनाचे अप्रूप वाटते. पक्ष ,विचार आणि राजकारण वेगळे जरी असले तर कष्ट करणाऱ्यांविषयी आदर व्यक्त करायचे मुंडे साहेबानी शिकवले आहे. दरम्यान, रविवारी झालेल्या दसरा मेळाव्यातही पंकजा मुंडे यांनी शरद पवारांचाही उल्लेख केला होता. कारण धनंजय मुंडे राष्ट्रवादीमध्ये आहेत. शरद पवारांशी आपले कसे जवळचे संबंध आहेत. फोन केल्यावर ते कसे प्रश्न सोडवाला मदत करतात, असेही पंकजा मुंडेंनी दाखवण्याचा प्रयत्न केला.

काय म्हणाल्या होत्या पंकजा मुंडे 

मी लोकांच्या मनातली मुख्यमंत्री, असं पंकजा मुंडे यांनी जाहीर भाषणात बोलून दाखवले आणि तिथून त्यांची पक्षात उलटी गिणती सुरू झाली. गोपीनाथ मुंडेंनंतर भाजपमधला बहुजनांचा चेहरा म्हणून पंकजाकडे पाहिले जात होते. मात्र, तरीही पंकजा यांना फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात दुय्यम दर्जाचे समजले जाणारे महिला बाल विकास, जल संधारण आणि ग्राम विकास खातं मिळाले. त्यातही जलयुक्त शिवार हा फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट असल्याने पंकजा यांच्याकडचं जल संधारण काढून राम शिंदे यांना देण्यात आले. त्यामुळे पंकजा विरुद्ध देवेंद्र असा संघर्ष प्रथमच चव्हाट्यावर आला.

हेही वाचा –

Corona पसवणाऱ्या चीनच्या वुहानमधून पुन्हा आली जगाची चिंता वाढविणारी बातमी!

First Published on: October 28, 2020 9:57 AM
Exit mobile version