घरमुंबईCorona पसवणाऱ्या चीनच्या वुहानमधून पुन्हा आली जगाची चिंता वाढविणारी बातमी!

Corona पसवणाऱ्या चीनच्या वुहानमधून पुन्हा आली जगाची चिंता वाढविणारी बातमी!

Subscribe

वुहानमधील ४ टक्क्यांपेक्षा कमी लोकांमध्ये कोरोनाच्या अँटीबॉडीज!

चीनच्या ज्या शहरातून कोरोनाचा फैलाव झाला त्या ठिकाणाहूनच पुन्हा चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. एका नवीन अभ्यासातून असे समोर आले आहे की वुहानमधील ४ टक्क्यांपेक्षा कमी लोकांमध्ये कोरोनाची अँटीबॉडीज निर्माण झाले आहेत. याचाच अर्थ वुहानला कोरोनाची प्रतिकारशक्ती मिळू शकली नाही.गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये वुहानमध्ये कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. या कारणास्तव वुहानला कोरोनाचे केंद्रबिंदू देखील म्हटले जाते. कोरोना संसर्गाच्या बर्‍याच रुग्णांमध्ये कोणत्याही प्रकारचे लक्षणं आढळून येत नाही. त्यामुळे असे मानले जाते की अधिकाधिक रुग्णांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात लोकांना वुहानमध्ये संसर्ग झाला असावा.

जामा नेटवर्क ओपनमध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार वुहानमधील बहुतेक लोकांना कोरोना रोगासाठी आवश्यक असणारी प्रतिकारशक्ती सापडली नाही, आणि जरी त्यांच्यात रोग प्रतिकारशक्ती तयार झाली असली तरीही ती अगदीच कमी होती. या अभ्यासानंतर कोरोनाविरूद्ध आवश्यक असणारी प्रतिकारशक्ती अपेक्षा पुन्हा कमी होताना दिसून येत आहे.

- Advertisement -

चीनमधील तोंगजी हॉस्पिटलच्या संशोधकांनी वुहानमधील २७ मार्च ते २६ मे दरम्यान ३५ हजारपेक्षा जास्त लोकांच्या अँटीबॉडीजची तपासणी केली, कोरोनाची पुष्टी झाली नाही. यापैकी कोणतीही ‘ IgM अँटीबॉडीज’ आढळली नाहीत. IgM अँटीबॉडीज संसर्गानंतर शरीरात तयार होतात. त्याच वेळी, नंतर तयार केलेले IgG अँटीबॉडीज शरीरात जास्त काळ राहतात. ही अँटीबॉडीज सुमारे ३.९ टक्के लोकांमध्ये आतापर्यंत आढळल्याचे सांगितले जात आहे.

वुहान हे चीनच्या हुबेई राज्याची राजधानी आहे. हुबेई येथे ६८ हजाराहून अधिक लोकांना कोरोनाचा फटका बसला. इथली परिस्थिती एवढी बिकट झाली होती की दोन रुग्णालये तात्पुरती बांधली गेली. अत्यंत कडक लॉकडाऊननंतर चीनने इथल्या कोरोना परिस्थितीवर मात केली. मे महिन्यात चीनने वुहानमधील प्रत्येक नागरिकाची कोरोना विषाणूची चाचणी घेण्याचा निर्णय घेतला होता आणि ५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व लोकांची चाचणी घेण्यात आली होती.


Bihar Election 2020 : बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान; १०६६ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -