आग्रीपाडा येथे म्हाडाच्या इमारतीचा भाग कोसळला; सुदैवाने जखमी नाही

आग्रीपाडा येथे म्हाडाच्या इमारतीचा भाग कोसळला; सुदैवाने जखमी नाही

आग्रीपाडा येथे म्हाडाच्या इमारतीचा भाग कोसळला

मुंबईतील आग्रीपाडा पोलीस स्टेशनच्या जवळ असलेल्या म्हाडाच्या तळमजला अधिक तीन मजली इमारतीचा काही भाग कोसळला. ही घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली. मात्र सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, आग्रीपाडा पोलीस स्टेशनच्या जवळ असणाऱ्या महाडाच्या ‘ बेन्झिर’ या तळमजला अधिक तीन मजली इमारतीचा मागील भाग शनिवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास अचानक कोसळला. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.

दरम्यान, या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर एक कुटुंब राहत होते. मात्र तीन दिवसांपूर्वीसुद्धा या इमारतीचा काही भाग पडल्याची घटना घडल्यानंतर ही इमारत पूर्णपणे रिकामी करण्यात आली असल्याची माहिती शिवसेनेच्या स्थानिक आमदार यामिनी जाधव यांनी दिली. या घटनेसंदर्भात स्थानिक नगरसेविका गीता गवळी यांना संपर्क साधला असता एवढी काही गंभीर घटना घडलेली नसून त्यात कोणीही जखमी झालेले नसल्याचे त्यांनी सांगितले.

First Published on: January 17, 2021 5:51 PM
Exit mobile version