पेट्रोल-डिझेल दरवाढ सुरुच, आजचे दर काय?

पेट्रोल-डिझेल दरवाढ सुरुच, आजचे दर काय?

पेट्रोल, डिझेल पुन्हा भडकणार? (प्रातिनिधिक फोटो)

पेट्रोल डिझेलच्या दरवाढीमध्ये सातत्याने होणारी वाढ अद्याप सुरुच आहे. आजही ही दरवाढ कायम आहे. मुंबईमध्ये आज पेट्रोलच्या दरामध्ये २८ पैशांनी वाढ झाली असून, मुंबईतील आजचा पेट्रोलचा दर ८९.२९ रुपये प्रतिलिटर इतका आहे. तर दुसरीकडे डिझेलचा दर १९ पैशांनी वाढला असून आज डिझेलचा भाव ७८.२६ रुपये प्रतिलिटरवर पोहोचला आहे. मुंबईसह राजधानी दिल्लीतही स्थानिकांना इंधन दरवाढीचा सामना करावा लागतो आहे. दिल्लीतील पेट्रोलचा आजचा दर ८१.९१ रुपये प्रतिलिटर असून, डिझेलचा दर ७३.७२ रुपये प्रितिलिटर इतका आहे. दरम्यान ऐन सणासुदीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या इंधन दरवाढीमुळे लोक हैराण झाले आहेत. पेट्रोल-डिझेलच्या या वाढत्या दरवढीचा परिणाम सर्वसामान्यांच्या दैनंदिन व्यवहारांवर देखील होताना दिसतो आहे.


वाचा : इंधनदरवाढीमुळे भाज्या भडकल्या

१५ दिवसांतील इंधन दरवाढीची आकडेवारी

मागील १५ दिवसांत पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्याने झालेली वाढ (सौजन्य- petroldieselprice.com)

काही दिवसांपूर्वीच काँग्रेसने इंधन दरवाढी विरोधात ‘भारत बंद’ पुकारला होता. शिवाय दरवाढ आणि महागाईची समस्या लक्षात घेता केंद्र सरकारने मंत्रीमंडळाची तत्काळ बैठकही घेतली होती. मात्र, आजही इंधनाच्या दरवाढीवर काही ठोस तोडगा निघाल्याचे चित्र दिसत नाहीये. मात्र, या इंधन दरवाढीचा विपरीत परिणाम आता सामान्यांच्या जीवनावश्यक वस्तूंवर होऊ लागला आहे.


वाचा : पेट्रोल-डिझेल दरवाढीवरुन भाजप सरकार ट्रोल

First Published on: September 16, 2018 11:52 AM
Exit mobile version