घरदेश-विदेशपेट्रोल-डिझेल दरवाढीवरुन भाजप सरकार ट्रोल

पेट्रोल-डिझेल दरवाढीवरुन भाजप सरकार ट्रोल

Subscribe

पेट्रोल आणि डिझेल दरवाढीवरुन राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. तर काँग्रेसने पुकारलेल्या भारत बंद दरम्यान भाजपने केलेल्या ट्विटवरुन भाजप सोशल मीडियावर ट्रोल होऊ लागले आहे.

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीविरोधात काँग्रेसने भारत बंदची हाक दिली होती. या बंदमध्ये काँग्रेससह २१ पक्ष मोदी सरकारचा निषेध करत रस्त्यावर उतरले होते. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीविरोधात आता राजकारण देखील तापायला सुरुवात झाली आहे. भारत बंदच्या दरम्यान भाजप सरकारने केलेल्या ट्विटवरुन आता ते सोशल मीडियावर ट्रोल होऊ लागले आहे. आधी राजकीय पक्षांनी या इंधन दरवाढीवरुन भाजप सरकारला सोशल मीडियावर घेरले होते. आता त्यानंतर सामान्य जनता देखील सोशल मीडियावर भाजपला ट्रोल करुन वेगवेगळे प्रश्न उपस्थित करत आहे.

मोदी सरकारला केले जातेय ट्रोल

काँग्रेसच्या भारत बंदनंतर भाजपानं ट्विटरवर पेट्रोल, डिझेल दरवाढीसंदर्भातील २००४ पासून म्हणजे काँग्रेसच्या काळापासून ते आतापर्यंतची आकडेवारी प्रसिद्ध केली. काँग्रेसच्या काळात इंधन दरात होत असलेली दरवाढ जास्त होती, असे सांगण्याचा प्रयत्न भाजपाने ट्विटरवर टाकलेल्या इन्फोग्राफिक्सच्या माध्यमातून केला आहे. मात्र मोदी सरकारला नेमकं काय सांगायचे आहे असा सवाल सध्या विचारला जातोय. भाजपच्या या ट्विटवर काँग्रेसने देखील ट्विट करत आंतरराष्ट्रीय बाजारातील आधीच्या आणि आताच्या दरांची तुलना करत भाजपाला सध्यस्थिती दाखवली आहे.

- Advertisement -

नेमकं काय आहे भाजपचं ट्विट

भाजपने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर एक ट्विट केले आहे. त्यामध्ये त्यांनी काँग्रेसच्या काळापासून ते आतापर्यंतची इंधन दरवाढ दाखवली आहे. ही दरवाढीची आकडेवारी दिल्लीतील पेट्रोलशी संबंधित आहे.१६ मे २००९ ते १६ मे २०१४ या काँग्रेसच्या काळात पेट्रोलचे दर ७५.८ टक्क्यांनी वाढ झाली होती, असे भाजपानं ट्विटमधील आकडेवारीच्या माध्यमातून सांगितले आहे. काँग्रेसच्या काळात पेट्रोलचे दर ४०.६२ रुपयांवरुन ७१.४१ रुपयांवर पोहोचले होते. मात्र भाजपा सत्तेत आल्यावर पेट्रोलचे दर फक्त १३ टक्क्यांनी वाढले आहेत. पेट्रोलचा दर ७१.४१ रुपयांवरुन ८०.७३ रुपयांवर गेले आहेत, असे सांगण्याचा भाजपने प्रयत्न केला आहे.

- Advertisement -

काँग्रेसने ट्विट करुन दिले उत्तर

भाजपने केलेल्या ट्विटला काँग्रेसने देखील ट्विट करुन उत्तर दिले आहे. १६ मे २००९ ते १६ मे २०१४ या काळात पेट्रोलचे दर ४०.६२ रुपयांवरुन ७१.४१ रुपयांवर पोहोचले. मात्र या काळात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर ८४ टक्क्यांनी वाढले होते, हे सांगण्याचा प्रयत्न काँग्रेसनं इन्फोग्राफीक्सच्या माध्यमातून केला आहे. मात्र भाजपच्या काळात कच्च्या तेलाच्या दर ३४ टक्क्यांनी कमी झाले. काँग्रेसच्या काळात १०७ डॉलर प्रति बॅरल असलेल्या कच्च्या तेलाचे दर आता ७१ डॉलर प्रति बॅलरपर्यंत खाली आले आहे. तरी देखील पेट्रोलचा दर ७१.४१ रुपयांवरुन ८०.७३ रुपयांवर गेला आहे, असं सांगून काँग्रेसने देखील भाजपला जशाच तसं ट्विट करुन उत्तर दिले आहे.

ट्विटवरुन भाजप सोशल मीडियावर ट्रोल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -