घरमुंबईइंधनदरवाढीमुळे भाज्या भडकल्या

इंधनदरवाढीमुळे भाज्या भडकल्या

Subscribe

इंधनाची होणारी दरवाढ व वाहतूक खर्चात झालेली वाढ यामुळे किरकोळ बाजारात भाजीपाल्याचे दर 20 ते 25 टक्क्यांनी वधारले आहेत.

इंधनाची होणारी दरवाढ व वाहतूक खर्चात झालेली वाढ यामुळे किरकोळ बाजारात भाजीपाल्याचे दर 20 ते 25 टक्क्यांनी वधारले आहेत. एपीएमसी मार्केट मधील घाऊक बाजारात जरी भाज्यांचे दर स्थिर असले तरी वाहतूक खर्चात झालेली वाढ तसेच येणारे सणासुदीचे दिवस यामुळे भाज्यांच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. त्यात भाज्यांची मागणी वाढत असल्याने किरकोळ बाजारातील भाजीपाल्याचे दर हे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.

महिनाभरापूर्वी 40 ते 50 रुपये प्रतिकिलो असणारी भाजी आज 60 ते 70 रुपए किलो दराने विकली जात आहे. ऐन सणासुदीच्या दिवसात झालेल्या या दर वाढीमुळे सामान्य नागरिक त्रस्त झाला असून महिन्याचा बजेट पूर्णतः कोलमडला आहे. घाऊक बाजारात इंधन दर वाढीचा परिणाम जरी जाणवत नसला तरी किरकोळ बाजारात मात्र इंधन वाढीचा परिणाम जाणवत असल्याने भाज्यांचे दर गेल्या आठवड्या पेक्षा दुपटीने वाढले आहेत. किरकोळ बाजारातील भाज्यांच्या दर वाढीमुळे सणासुदीला महिलांच्या किचनचे बजेट नंतर पार कोलमडून जाणार की काय अशी भीती सर्वसामन्यांना लागली आहे. घाऊक बाजारात मात्र भाज्यांची 637 गाड्यांची आवक झाली आहे.घाऊक बाजारात टोमॅटो प्रति 4 ते 5 रुपये किलो तर चांगल्या प्रतीचे टोमॅटो 6 ते 8 रुपये प्रति किलो विकला जात आहे तर वाटाणा 30 ते 40 रुपये किलोने कमी झाला असून घाऊक बाजारात 8 ते 10 रु प्रति किलो वाटाणा विकला जात आहे. इंधनदर वाढ व भारत बंदचा भाजीपाला मार्केट वर कोणताही परिणाम झाला नाही.

- Advertisement -

 

नेहमी प्रमाणे मालाची आवक होत असून दर ही गेल्या महिण्यापासून स्थिर राहिले आहेत. नाशवंत माल असल्याने सहसा त्याचा परिणाम जाणवत नाही. माल खराब होऊ नये म्हणून आम्ही उधारीही देतो. इंधन दर वाढीचा फटका किरकोळ व्यापारी वर्गाला बसतो. कारण त्यांना माल उचलून दुसरीकडे नेऊन विकावा लागतो.
– घाऊक व्यापारी, कैलास ताजणे

किरकोळ बाजारावर बसल्याने भाज्यांचे दर वाढले आहेत. किरकोळ व्यापारी वर्गाला घाऊक व्यापारी वर्गाकडून माल घेऊन दुसरीकडे विकावा लागतो त्यामुळे खर्च ही वाढला जातो.
अमोल माळी (किरकोळ भाजी विक्रेता)

किरकोळ बाजारातील आजचे दर

- Advertisement -

भाजीपाला. प्रति किलो दर.

  वांगी – ६०-६५

 दोडका – ६०

 कार्ली – ५० – ६०

 शेवगा ८० – ९०

 कोबी – ४०

 फ्लॉवर – ५०

 गाजर – ५०

काकडी – ५०

 वटाणा – १०० – १२०.

 टोमॅटो – ५०

गवार – ८०

 भेंडी – ६०

शिमला मिरची – ६०

फरसबी – ८० – ९०

पालेभाजी

मेथी – 30

पालक – 20

चवळी – 20

कोथिंबीर – 30

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -