१३ लाख रुपयांचं घड्याळ चोरी ; चोर जेरबंद

१३ लाख रुपयांचं घड्याळ चोरी ; चोर जेरबंद

पतीसह प्रेयसीला अटक

कुलाब्यातील रेडिओ क्लबमधून एका व्यवसायकाचे १३ लाखाचे मनगटी घड्याळ चोरी प्रकरणी कुलाबा पोलिसांनी सफाई कर्मचाऱ्याला अटक केली आहे. त्याने चोरी केलेले १३ लाख किंमतीचे घड्याळ हस्तगत करण्यात आली असल्याची माहिती कुलाबा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय धोपावकर यांनी दिली आहे. हे महागडे घड्याळ भेट म्हणून व्यापाऱ्याला मिळाले होते. या व्यापाऱ्याचे नाव दक्षेस शहा असे असून ते दक्षिण मुंबईतील मरीन ड्राइव्ह या ठिकाणी आपल्या कुटुंबासह राहतात. दक्षेस हे कुलाबा येथील रेडिओ क्लबचे सन २००३ पासून सभासद असून आठवड्यातून दोन वेळा ते क्लबमध्ये जात असतात.

हेही वाचा – गेम खेळण्यासाठी विद्यार्थ्यांनी शाळेतील कंप्युटर्सचीच केली चोरी

काय आहे नेमकं प्रकरण?

गेल्या आठवड्यात ते सायंकाळी नेहमी प्रमाणे क्लबमध्ये गेले होते. दुसऱ्या मजल्यावर असलेल्या स्नुकर गेम खेळून त्यानंतर ते फ्रेश होण्यासाठी तेथील बाथरूममध्ये गेले. त्यांनी मनगटी घड्याळ पाण्यात भिजू नये म्हणून खिडकीवर काढून ठेवले होते. दक्षेस यांना त्यांच्या एका मित्राने बाहेरून आवाज दिल्यामुळे ते तसेच बाहेर गेले. काही वेळाने मनगटी घड्याळ बाथरूम मध्ये विसरल्याचे लक्षात येताच बाथरूममध्ये परत आले असता त्याठिकाणी घड्याळ मिळाले नाही, त्यांनी शोधाशोध केली परंतु घड्याळ कुठेही मिळाले नाही. त्यांनी क्लब व्यवस्थापनाला ही बाब लक्षात आणून दिली. दुसऱ्या दिवशी पुन्हा रेडिओ क्लबला दक्षेस आले आणि त्यांनी घड्याळ मिळाले का या बाबत चौकशी केली. परंतु घड्याळ मिळून आले नसल्यामुळे त्यांची बैचनी वाढली. कारण ते घड्याळ ओडेमार्स पीआरजे या कंपनीचे चक्क १३ लाख रुपये किमतीचे होते. महत्वाचे म्हणजे त्यांना त्यांच्या एका मित्राने वाढदिवसाची भेट म्हणून २०१४ मध्ये हे महागडे घड्याळ दिले होते. ओडेमार्स पीआरजे कंपनीचे रॉयल ओक ऑफशोर या माडेल असलेले सर्वात महागडे हे घड्याळ आहे. घड्याळ न मिळाल्यामुळे अखेर दक्षेस शहा यांनी कुलाबा पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.

हेही वाचा – चोरीच्या संशयावरुन तरुणाची केली हत्या!

पोलिसांनी असा लावला आरोपीचा तपास

पोलिसांनी अज्ञात इसमा विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी ताबडतोब रेडिओ क्लबमधील कर्मचारीऱ्यांची चौकशी सुरु केली आणि सीसीटीव्ही कॅमेराच्या मदत घेतली. दरम्यान तपास सुरू असताना पोलीसांना जागिर सुकान चव्हाण (५३) या सफाई कर्मचाऱ्यावर संशय आला. पोलिसांच्या चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली, अशी माहिती कुलाबा पोलीस ठाण्याचे वपोनी विजय धोपावकर यांनी दिली. दक्षेस शहा हे बाथरूममधून बाहेर पडले असता काही वेळाने सफसफाईच्या कामासाठी जागिर हा बाथरूममध्ये गेला आणि त्याला खिडकीवर ठेवलेले घड्याळ आढळून आले. त्याने ते घड्याळ स्वतःजवळ ठेऊन घेतले. मात्र हे घड्याळ्याची किंमत १३ लाख असेल याची पुसटशी कल्पना देखील त्याला नव्हती. अशी माहिती पोलिसांनी दिली या चोरी प्रकरणी कुलाबा पोलिसांनी जागिरला अटक केली आहे.


हेही वाचा – कळंबोलीत ५० लाखांची चोरी करणारा जेरबंद

First Published on: November 20, 2018 9:40 PM
Exit mobile version