घरमुंबईकळंबोलीत ५० लाखांची चोरी करणारा जेरबंद

कळंबोलीत ५० लाखांची चोरी करणारा जेरबंद

Subscribe

मदत मागितलेल्या प्रवाशाला लुटून पसार झालेल्या चोरांना पोलिसांनी सीसीटीवीच्या मदतीने अटक केले आहे. या चोरट्यांनी ५० लाखांचा मुद्देमाल लंपास करण्याचा प्रयत्न केला.

कळंबोली मॅक्डोनाल्ड हॉटेल समोरुन सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या आरोपींना जबलपूर येथून अटक करण्यात नवी मुंबई पोलिसांना यश आले आहे. सीसीटीवीच्या अधारावर पोलिसांनी या चोरांना शोध घेतला असून अखेर या चोरट्यांना जेरबंद करण्यात आले आहे.

अशी घडली घटना

कर्नाटक येथे राहणारे संतोष मुरबी हे ५ नोव्हेंबर रोजी बेळगांव येथे जाण्यासाठी कळंबोली मॅक्डोनोल्ड हॉटेल समोर सायन पनवेल रोडवर थांबले होते. तेव्हा रात्री ९ च्या सुमारास त्यांना एका गाडीला हाथ दाखवला. भाडे विचारून ते कारमध्ये बसून निघाले होते. त्यावेळी कारमधील चार अनोळखी इसमांनी फिर्यादी मुरबी यांना मारहाण करून त्यांच्या डोळयात मिरचीची पुड टाकली. कारमधील चौकडीने संतोष मुरबी यांच्या शर्टाच्या आतील जॅकेटचा खिसा फाडून खिशात ठेवलेल्या १० हजार २०० रुपये रोख व १८९० ग्रॅम वजन असलेल्या २० सोन्याच्या चैनी व २ मोबाईल असा एकूण ५० लाख ७० हजार ६९० रुपये किंमतीचा माल चोरी केला.

- Advertisement -

पोलिसांनी असा केला तपास

या प्रकराबाबत संतोष मुरबी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलीस उप आयुक्त परिमंडळ – २ यांच्या सुचनेनुसार तात्काळ वेगवेगळी तपास पथके तयार करण्यात येऊन सीसीटीव्ही फुटेजमधून आरोपींनी वापरलेल्या गाडीचा नंबर प्राप्त करण्यात आला. प्रथम गाडी मालक, त्यानंतर वाहन चालक व त्याचे सहकारी असा तपास करुन आरोपी हे मध्य प्रदेशातील जबलपूर रिवा येथे जात असल्याची माहिती तपासादरम्यान पोलिसांच्या हाती लागली. तत्काळ जबलपूर रिवा येथे आरोप पोहचण्यापुर्वी एक पोलीस तपास पथक जबलपूर येथे पोहचण्याची व्यवस्था करण्यात आली . या गुन्हयातील आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याने , नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील रेकॉर्डवरुन आरोपीचे फोटोसह सखोल माहिती प्राप्त करण्यात आली. याचा फायदा पोलिसांना तपासात झाला.आरोपी हे कुर्ला रेल्वे स्टेशन येथुन काशी एक्सप्रेसने जबलपुर येथे जाण्यासाठी बसले होते . परंतु पोलीस त्यांच्या मागावर असल्याची त्यांना शंका आल्याने पोलिसांना चकवा देण्यासाठी ते इगतपुरी येथे उतरले . त्यानंतर पॅसेंजर रेल्वेने इगतपुरी ते इटारसी असा प्रवास केला . आरोपीत हे रेल्वेने पलायन करीत असल्याने पलायन मार्गावरील पुढील रेल्वे स्टेशन जळगाव येथील स्थानिक पोलीसांची मदत घेऊन आरोपींचा कसोशीने शोध घेण्यात आला.परंतु आरोपी हे वारंवार ट्रेन बदलत असल्याने पोलिसांना हुलकावणी देण्यात यशस्वी होत होते. आरोपी हे पुढे जबलपुरच्या दिशेने जाणार असल्याबाबत खात्रीशीर माहीती प्राप्त झाल्याने त्यांचा शोध घेण्यासाठी पथक तात्काळ शिघ्रतेने जबलपुर येथे रवाना करण्यात आले . जबलपूर येथील आरपीएफ यांचे मदतीने पोलिस तपास पथकाने सकाळी ११ वाजताच्या सुमारास जबलपूर रेल्वे स्टेशन येथे सापळा रचून २ आरोपींना ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेतलेल्या आरोपी कडून सोन्याच्या चैनी हस्तगत करण्यात आल्या. तसेच आरोपी यांनी गुन्हयामध्ये वापरलेली गाडीचा चालक हा गुन्हयातील इतर आरोपीचा नातेवाईक असून चालक आरोपी याचा गुन्हयातील सहभाग स्पष्ट झाल्याने त्यास गुन्हयामध्ये अटक करण्यात आली आहे.तसेच गुन्हयामध्ये पाचव्या आरोपीचा सहभाग निष्पन्न झाल्याने सदर गुन्ह्यामध्ये भादवि ३९७ कलम वाढविण्यात आलेले असून त्याचा कसून शोध सुरू आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -