पंतप्रधानांचा दौरा मार्गातील रस्ते चकाचक

पंतप्रधानांचा दौरा मार्गातील रस्ते चकाचक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍याची तयारी जोरदारपणे सुरू असतानाच शुक्रवारी पालिकेने त्यांच्या दौरा मार्गातील रस्ते चकाचक करून त्या मार्गावरील स्पीड ब्रेकर काढले. तसेच या मार्गातील सर्व अतिक्रमणावर धडक कारवाई करून हटविण्यात आली. मंगळवार १८ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कल्याण पश्चिमेतील फडके रस्त्यावर जाहिर सभा होणार आहे. पंतप्रधानांसाठी कल्याणच्या जवळ हेलिपॅड उभारण्यात येणार असून तेथून ते मोटारीने सभास्थळी पोहचणार आहेत. त्यामूळे या संपूर्ण परिसरावर महापालिकेने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. हेलिपॅडपासून ते फडके मैदानापर्यंतचा मार्ग मोकळा करण्यासह सुरूवात केली.

पंतप्रधान यांच्या दौर्‍याचा एक प्रोटोकॉल म्हणून हेलिपॅडपासून फडके मैदानापर्यंतच्या मार्गावरील सर्व स्पीडब्रेकर काढण्यात आले. तसेच फुटपाथवर असणारी अतिक्रमणांवर जोरदार कारवाई करीत ती काढण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या मार्गाने जातील तो परिसर चकाचक दिसावा या हेतूने पालिका प्रशासन कामाला लागले आहे.

First Published on: December 15, 2018 5:16 AM
Exit mobile version