धक्कादायक: शिक्षा म्हणून मुलाची पॅन्ट उतरवली

धक्कादायक: शिक्षा म्हणून मुलाची पॅन्ट उतरवली

प्रातिनिधीक फोटो

नवी मुंबईच्या खाजगी शाळेत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. वर्गात शिट्टी वाजवली म्हणून १ लीच्या वर्गात शिकणाऱ्या ५ वर्षांच्या मुलाला सगळ्या वर्गासमोर पॅन्ट उतरवण्याची भयंकर शिक्षा या शाळेतल्या शिक्षिकेने दिली आहे. मुलाच्या आईच्या तक्रारीवरुन शिक्षिकेला पोलिसांनी ताब्यात घेतले असून यासंदर्भात चौकशी सुरु असल्याची माहिती कळंबोली पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक मच्छींद्र खाडे यांनी दिली.

पोलिसांनी शिक्षिकेला ताब्यात घेतल्यानंतर चौकशी केली असता शिक्षिकेने आपला गुन्हा कबूल केला. मात्र स्पष्टीकरण देताना शिक्षिकेने सांगितले की, तो मुलगा माझ्या मुलासारखाच आहे. मात्र तो वर्गात शिट्टी वाजवत होता. त्याने पुन्हा असा प्रकार करु नये तसेच इतर सर्व विद्यार्थांवर जरब बसावी म्हणून अशी शिक्षा दिली असल्याचे शिक्षिकेने सांगितले आहे. पण मुलाच्या आईने पोलिसात तक्रार करताना म्हटले की, मुलांना अशा प्रकारची शिक्षा देणे पुर्णपणे गैर आहे. याने मुलांच्या मानसिकतेवर परीणाम होवू शकतो त्यामुळे अशी शिक्षा देताना शिक्षिकेने विचार करायला हवा होता, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

उत्तरप्रदेशमध्येही यासारखीच घटना

दरम्यान, २०१७ साली उत्तरप्रदेशमध्ये अशा प्रकारची घटना घडली होती. सोनभद्रा जिल्ह्यातल्या अनपारामध्ये मुलींसाठी असणाऱ्या शाळेत शिक्षेच्या नावाखाली मैदानात ‘स्कर्ट’ न घालता पळायला सांगितले होते. यानंतर या शाळेच्या प्राचार्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता.

मुलांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होईल अशी शिक्षा देणे बंधनकारक असतानासुद्धा अशा प्रकारच्या शिक्षा दिल्याने शाळेच्या विरोधात पालकांनी संताप व्यक्त केला आहे.

First Published on: July 19, 2018 1:14 PM
Exit mobile version