माजी मंत्री प्रफुल्ल पटेल यांची मालमत्ता जप्त; इक्बाल मिर्ची प्रकरणी ईडीची कारवाई

माजी मंत्री प्रफुल्ल पटेल यांची मालमत्ता जप्त; इक्बाल मिर्ची प्रकरणी ईडीची कारवाई

840 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी प्रफुल्ल पटेल यांना दिलासा; 'एअर इंडिया विमान लीज' प्रकरणी CBIकडून तपास बंद

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्याकडे असलेल्या वरळीतील सीजय हाऊस या इमारतीतील मालमत्ता जप्त झाल्याच्या माहितीला दुजोरा देण्यात आला आहे. सक्तवसुली संचालनालय या विभागाकडून गेल्या वर्षी ही कारवाई करण्यात आली होती. अंडरवर्ल्ड डॉन इक्बाल मिर्ची प्रकरणी ही कारवाई करण्यात आली होती.

प्रफुल्ल पटेल आणि त्यांच्या मालकीतील मिलेनियम डेव्हलपर्स या बांधकाम कंपनीने 2006-07 या वर्षामध्ये दक्षिण मुंबई येथे असलेल्या वरळीतील सीजय हाऊस या नावाची इमारत बांधली. पण ज्या जमिनीवर या इमारतीचे बांधकाम करण्यात आले ती जमीन अंडरवर्ल्ड डॉन इक्बाल मिर्चीची होती. इक्बाल हा त्यावेळी कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचे मुंबईत असलेले सर्व अवैध काम पाहत होता.

या इमारतीचे काम पूर्ण झाल्यानंतर या जागेवर इमारत बांधण्यात देण्यात आल्याने त्याचा मोबदला म्हणून या इमारतीत असलेला तिसरा आणि चौथा मजला हा प्रफुल्ल पटेल यांच्या कंपनीने इक्बालची बायको हाजरा मिर्ची हिच्याकडे हस्तांतरित केला. यानंतर इक्बाल मिर्चीचे नाव हवाला घोटाळ्यामध्ये आले. ज्यामुळे ईडीकडून त्याच्या या घोटाळ्याबाबतचा पुढील तपास करण्यास सुरुवात करण्यात आली. दरम्यान, इक्बाल मिर्चीकडे असलेली सर्व संपत्ती ही त्याने हवालाच्या पैशांमधून खरेदी केली असल्याचे ईडीच्या तपासात उघड झाले. त्यामुळे ईडीकडून सीजय हाऊस विरोधात देखील कारवाई करण्यात आली.

दरम्यान, ईडीने या कारवाई अंतर्गत सीजय हाऊस या इमारतीतील तिसरा आणि चौथा मजला जप्त केला होता. या जप्त करण्यात आलेल्या जागेची सध्याची किंमत ही बाजारभावानुसार 100 कोटी इतकी आहे. धक्कादायक बाब म्हणजे इक्बाल मिर्ची याचे संपूर्ण कुटुंब या प्रकरणात फरार आहे.

हेही वाचा – पश्चिम रेल्वे मार्गावरील ‘या’ स्थानकांचा होणार कायापालट

तर ईडीच्या विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याच इमारतीमध्ये माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांचा 3500 चौरस फूट क्षेत्रफळ असलेला फ्लॅट आहे. ज्यामुळे ईडीकडून प्रफुल्ल पटेल यांची सुद्धा 2019 मध्ये तब्बल 12 तास चौकशी करण्यात आली होती. त्यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी दिलेल्या जबाबावरून ईडीने या इमारतीतील सर्व मजले जप्त केले होते. ज्याबाबत ईडीकडून पुष्टी करण्यात आली आहे.

First Published on: February 9, 2023 10:31 AM
Exit mobile version