रविवारी मध्य आणि ट्रान्सहार्बर मार्गांवर मेगाब्लॉक

रविवारी मध्य आणि ट्रान्सहार्बर मार्गांवर मेगाब्लॉक

मध्य आणि ट्रान्सहार्बर रेल्वे मार्गांवर २८ ऑक्टोबर रोजी मेगाब्लॉक ठेवण्यात आला आहे. या दिवशी सकाळी ११.१५ ते दुपारी ३.३४ पर्यंत दुरुस्तीची कामे चालणार आहेत. तर पश्चिम आणि हार्बर रेल्वेवर रविवारी दिवसा कोणताही मेगाब्लॉक घेतला जाणार नाही. त्याचप्रमाणे पश्चिम रेल्वेवर शनिवारी वसई ते पालघर दरम्यान शनिवारी रात्री ११.५० ते पहाटे २.५० पर्यंत ब्लॉक चालणार आहे. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्यांचे मेगाहाल होण्याची शक्यता आहे.
मुंबईतील मध्य आणि ट्रान्सहार्बर या रेल्वे मार्गांवर रविवारी २८ ऑक्टोबर रोजी मेगाब्लॉग ठेवण्यात आला आहे. रेल्वेच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सुटणाऱ्या सर्व जलद आणि अर्धजलद लोकल सकाळी १०.०५ ते दुपारी ३.२२ पर्यंत घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि दिवा स्थानकात थांबणार आहे. तर मेगाब्लॉग दरम्यान या लोकल सुमारे २० मिनिटे उशिराने धावणार आहेत.

एक्सप्रेस गाड्यांचे वेळापत्रक

ठाण्याहून सीएसएमटी आणि दादरसाठी जाणाऱ्या सर्व मेल, एक्सप्रेस सकाळी १०.५० नंतर मुलुंड आणि माटुंगामध्ये अप धीम्या मार्गावर गाड्या सुमारे २० मिनिटे उशिराने धावणार आहेत. तर रत्नागिरी – दादर पॅसेंजर दिवा येथेच थांबण्यात येणार आहे. दादर ते रत्नागिरी पॅसेंजर रविवारी दिव्याहून सुटणार असून दादर ते दिव्यापर्यंत मध्य रेल्वेने दुपारी ३.४० वाजता विशेष लोकल सोडली असून ही लोकल ठाणे आणि दिवा स्थानकांत थांबणार आहे.

ट्रान्सहार्बर मार्गावरील वेळापत्रक

ट्रान्सहार्बर मार्गावर ठाणे ते वाशी, नेरुळ मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ३.४० पर्यंत ब्लॉक चालणार आहे. तर ठाण्याहून वाशीपर्यंत सकाळी १०.३५ ते दुपारी ४.०७ पर्यंत आणि वाशीहून ठाण्याकडे सकाळी १०.४५ ते दुपारी ३.३८ पर्यंत लोकल सेवा खंडित राहणार आहे. तर या कालावधीत ठाणे ते वाशी, नेरुळ, पनवेलपर्यंतही सेवा खंडित राहणारणा आहे.

पश्चिम रेल्वे मार्गावरील वेळापत्रक

पश्चिम रेल्वेवर रविवारी सकाळी ११.५० ते पहाटे २.५० पर्यंत वसई ते वैतरणा स्थानकांपर्यंत ब्लॉक घेतला जाणार असल्याने मेल, एक्स्प्रेस उशिराने धावणार आहे.

First Published on: October 27, 2018 11:11 AM
Exit mobile version