मुंबईतील ‘या’ रेल्वे स्थानकांचे बदलणार रुप

मुंबईतील ‘या’ रेल्वे स्थानकांचे बदलणार रुप

सौ. मुंबई मिरर

मुंबईमध्ये लोकल ट्रेनने प्रवास करताना सामान्य मुंबईकरांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. रेल्वे स्थानकावरून जात असताना अनेक ठिकाणी पानांच्या, तंबाखूच्या पिचकऱ्यांनी रंगलेले कोपरे, किळसवाणी वाटणारी अस्वच्छता, जीव मुठीत घेऊन चालायला लावणारे पुल अशा अनेक सोयी सुविधांचा अभाव असणाऱ्या मुंबईतील काही स्थानकांचा चेहरा मोहरा बदलणार आहे.

या रेल्वे स्थानकांमध्ये कांदिवली, मीरारोड आणि गुरू तेग बहादूर नगर या रेल्वे स्थानकांमध्ये लवकरच खाण्याचे स्टॉल्स, ओपन एअर रेस्टॉरन्ट आणि इतर सुविधा दिल्या जाणार आहे. या रेल्वे स्थानकांसोबत मुंबईतील १६ रेल्वे स्थानकांचा येत्या पाच वर्षात कायापालट करण्यात येणार आहे.

रेल्वे विकास महामंडळाने तयार केलेल्या योजनेनुसार, मुंबईतील रेल्वे स्थानकांचे स्वरूप बदलावे याकरिता पश्चिम रेल्वेच्या कांदिवली आणि मीरारोड, तर हार्बर मार्गावरील गुरू तेग बहादूर नगर स्थानकाच्या विकासाचे काम लवकरात लवकर हाती घेण्यात येणार आहे. तसेच आगामी पाच वर्षात या तीन स्थानकांच्या विकासाचे काम पुर्ण करण्याचे महामंडळाने निश्चित केले आहे.

अशा स्वरूपात दिसणार रेल्वे स्थानकं!

मीरारोड

कांदिवली

गुरू तेग बहादूर नगर

First Published on: June 26, 2019 12:02 PM
Exit mobile version