मंत्री धुडगूस घालताहेत मग शिवजयंती, मराठी भाषा दिनाला नकार का?–राज ठाकरे बरसले

मंत्री धुडगूस घालताहेत मग शिवजयंती, मराठी भाषा दिनाला नकार का?–राज ठाकरे बरसले

राज्य सरकारने परवानगी नाकारलेली असतानाही मनसेने आज शिवाजी पार्क य़ेथे सरकारच्या नाकावर टिच्चून मराठी भाषा दिनानिमित्त मराठी स्वाक्षरी मोहिम राबवली. यास मराठी सेलिब्रिटीजसह सामान्य मराठी माणसांनीही भरघोस प्रतिसाद दिला. मात्र यावेळी राज ठाकरे यांनी सरकारचा चांगलाच समाचार घेतला. “मंत्री गर्दी करून धुडगूस घालतात आणि शिवजयंती, मराठी भाषा दिनाला सरकार नकार देते. करोनाचं संकट येतंय असं वाटत असेल, तर मग निवडणुकाही पुढे ढकला,” अशा शब्दात राज यांनी सरकारवर निशाणा साधला.

तसेच यावेळी राज ठाकरे यांना पत्रकारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्याच्या विधानाबदद्ल  विचारले. त्यावेळी त्यांच्या हातातच सरकार असून इच्छा असेल तर होईल असे राज म्हणाले. त्याचबरोबर त्यांनी मराठी जनतेला मराठीत स्वाक्षरी करण्याचे आवाहनही केले. आसवं गाळत बसण्यापेक्षा सुरुवात करण गरजेचं असं सांगत त्यांनी मी पासपोर्टपासून सगळ्याच कागदपत्रांवर मराठीत सही करत असल्याचे सांगितले.

First Published on: February 27, 2021 12:53 PM
Exit mobile version