Ranichi Baug : राणी बागेत प्राण्यांचे ब्रिडिंग सेंटर सुरू करण्याबाबत आदित्य ठाकरेंचे सूतोवाच

Ranichi Baug : राणी बागेत प्राण्यांचे ब्रिडिंग सेंटर सुरू करण्याबाबत आदित्य ठाकरेंचे सूतोवाच

राणीच्या बागेत बंगाल वाघाची जोडी शक्ती (नर) व करिष्मा (मादी) यांनी 14 नोव्हेंबर 2021 रोजी ‘विरा’ या मादी बछड्याला जन्म दिला. तर हम्बोल्ट पेंग्विन कक्षातील मोल्ट (नर) व फ्लिपर (मादी ) यांच्या जोडीने 18 ऑगस्ट 2021 रोजी ‘ऑस्कर’ या पेंग्विन नर बछड्याला जन्म दिला आहे. तर हम्बोल्ट पेग्विन कक्षातील डोनाल्ड (नर ) व डेझी (मादी ) यांनी 1 मे 2021 रोजी जन्म दिलेल्या नर पिल्लाचे नाव ‘ओरिओ’ असे ठेवण्यात आले आहे. त्यामुळे राणी बाग हे प्राण्यांचे ब्रिडींग सेंटर बनत चालले आहे.त्यामुळे यापुढे राणी बागेतील देशी, विदेशी प्राण्यांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही.राज्याचे पर्यटन, पर्यावरण व पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी, राणी बागेत प्राण्यांचे ब्रिडिंग सेंटर सुरू करण्याबाबत सूतोवाच केले होते.

काही दिवसांपूर्वी कोविडचा संसर्ग व रुग्णसंख्या वाढल्याने मुंबईतील उद्याने, मैदाने बंद करण्यात आली. पालिकेने केलेल्या विविध उपाययोजनांमुळे सध्या कोविड रुग्णसंख्या कमी कमी होत आहे. त्यामुळे अशा प्रकारे कोविड नियंत्रणात आल्यास पुन्हा एकदा निर्बंध शिथिल केले जातील. राणी बागेचे दरवाजे पर्यटकांसाठी पुन्हा उघडले जातील.

त्यामुळे आता पर्यटकांना पेंग्विन व वाघांच्या बछड्याला जवळून बघण्याचा आनंद पुन्हा एकदा लुटता येणार आहे.
राणी बागेत गेल्या 1 मे 2021 पासून ते 14 नोव्हेंबर या सहा महिन्यांच्या कालावधीत पेंग्विनची दोन पिल्ले आणि वाघांच्या मादी बछडीचा अशा तिघांचा जन्म झाला आहे. त्यामुळे आता राणीबाग पक्षी आणि प्राण्यांचे ब्रिडींग सेंटर म्हणून उदयास येत असल्याचे म्हटले तर वावगे होणार नाही.दरम्यान, आगामी काळात राणीबागेत भारतीय वंशाच्या प्राण्यांचे शास्त्रोक्त पद्धतीने ब्रीडिंग केले जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.ब्रिडींग द्वारे प्राण्यांची संख्या वाढवून इतर प्राणी संग्रहालयाला प्राणी देऊन इतर प्राणी राणीबागेत आणले जातील, अशी माहिती संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी दिली.


हेही वाचा – Nagar Panchayat Election : नगर पंचायत निवडणुकीत यशाचे दावे प्रतिदावे, सर्वाधिक जागा मिळाल्याचा भाजप -राष्ट्रवादीचा दावा


 

First Published on: January 19, 2022 11:40 PM
Exit mobile version