घरताज्या घडामोडीNagar Panchayat Election : नगर पंचायत निवडणुकीत यशाचे दावे प्रतिदावे, सर्वाधिक जागा...

Nagar Panchayat Election : नगर पंचायत निवडणुकीत यशाचे दावे प्रतिदावे, सर्वाधिक जागा मिळाल्याचा भाजप -राष्ट्रवादीचा दावा

Subscribe

भाजप हा जगातील सर्वात मोठा पक्ष असल्याचा दावाच हास्यास्पद आहे. मिस कॉल करून फसवून एक नंबरचा पक्ष असल्याचा दावा करणारा भाजप जगातील पहिला पक्ष आहे. जनता त्यांचा भूलथापांना बळी पडत नाही हेच नगरपंचायतीच्या निकालावरुन दिसून आल्याचे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

राज्यातील १०६ नगरपंचायती, विविध पोटनिवडणुका तसेच भंडारा, गोंदिया जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्याचा दावा केला आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाकडून यशाचे दवे प्रतिदावे करण्यात येत असल्याने मतदारांनि नेमका कुणाला कौल दिला याबाबत संभ्रम आहे. अशातच राज्य निवडणूक आयोगाकडून संध्यकाळी उशिरापर्यंत निवडणूक निकाल प्राप्त झाले नव्हते.

राज्यातील नगरपंचायत निवडणुकांचे निकाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाजूने लागले असून हे निकाल पाहता राष्ट्रवादी काँग्रेस राज्यातील नंबर एकचा पक्ष ठरल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे.

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसने राष्ट्रवादी परिवार संवाद दौरा करुन तळागाळातील कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला होता, त्यांचे म्हणणे ऐकून घेतले होते. पक्षाच्या बांधणीसाठी विविध उपक्रमे, आंदोलने, कार्यक्रमे हाती घेतली होती. जनता दरबार उपक्रमातून जनतेची कामेही तत्परतेने सोडवण्याचा प्रयत्न केला होता त्याचाही फायदा या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला झाला आहे.या निकालांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत बोलणाऱ्यांना चांगलीच चपराक लागवल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.

आघाडी सरकारकडून धनशक्ती, दंडशक्ती, सत्तेचा कितीही गैरवापर झाला तरी भाजप हा क्रमांक एकचा पक्ष होता-राहील.भाजपच्या २४ आणि सहयोगी मिळून सर्वाधिक ३० नगरपालिकांमध्ये भाजपने सत्ता प्राप्त केल्याचा तसेच सदस्यसंख्येत सुद्धा सर्वाधिक ४१५ हून अधिक जागा जिंकत भाजप हाच क्रमांक एकचा पक्ष बनला आहे, असा दावा विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

- Advertisement -

जिल्हा परिषदा आणि नगरपालिका निवडणुकीत भाजपने मिळविलेल्या या दणदणीत यशाचे शिल्पकार आपले सारे कठोर परिश्रमी कार्यकर्ते आहेत.मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो. महाविकास आघाडी सरकारचा कारभार नाकारणार्‍या सर्व मतदारांचेही मन:पूर्वक आभार मानतो. कितीही पक्ष एकत्र आले तरी या देशातील जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्त्वावर विश्वास ठेवते, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.

निवडणुकीत भाजपने सर्वाधिक जागा मिळविल्या – पाटील

राज्यातील नगरपालिका, नगरपंचायती तसेच भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक जागा मिळविल्या असून पुन्हा एकदा ‘भाजपच नंबर वन’ हे सिद्ध झाले आहे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सांगितले.

भाजपला या निवडणुकीत चारशेपेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत. स्वबळावर किंवा काही मदत घेऊन ३४ नगरपालिका – नगरपंचायतींमध्ये भाजपची सत्ता असेल. गोंदिया जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता असेल तर भंडारा जिल्हा परिषदेत मदत घेऊन भाजपा सत्तेवर येईल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

काँग्रेस पक्षाची कामगिरी सुधारली – नाना पटोले

तर राज्यात नगरपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाची कामगिरी सुधारली आहे. विदर्भात काँग्रेस पक्ष आघाडीवर आहे तर कोकणात पक्षाने खाते खोलले आहे. आजचा निकाला पाहता आम्हाला समाधानकारक जागा मिळाल्या आहेत, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

नगर पंचायत निवडणुकीच्या निकालाने राज्यातील जनतेने आपला कौल महाविकास आघाडीच्या बाजून दिला असून भाजपला नाकारले आहे. भाजपने मागील वेळी ६०० पेक्षा जास्त जागा जिंकल्या होत्या, त्या आता ३०० वर खाली घसरल्या आहेत. आम्ही १७ नगरपंचायतीवरून २२ वर गेलो आहोत. काँग्रेस पक्षाने ३०० हून अधिक जागा जिंकल्या असून काँग्रेस विचारांच्या स्थानिक आघाड्यांनी ही चांगले यश मिळवले आहे, असे पटोले म्हणाले.

भाजपचा दावा हास्यास्पद – नाना पटोले

भाजप हा जगातील सर्वात मोठा पक्ष असल्याचा दावाच हास्यास्पद आहे. मिस कॉल करून फसवून एक नंबरचा पक्ष असल्याचा दावा करणारा भाजप जगातील पहिला पक्ष आहे. जनता त्यांचा भूलथापांना बळी पडत नाही हेच नगरपंचायतीच्या निकालावरुन दिसून आल्याचे नाना पटोले यांनी म्हटले आहे.


हेही वाचा : मुख्यमंत्री पद असलेला पक्ष चौथ्या क्रमांकावर फेकला गेला हे दुर्दैवी, देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -