कंगना BMC विरोधात कायदेशीर कारवाई करणार, तोडफोडीमुळे झाले २ कोटींचे नुकसान!

कंगना BMC विरोधात कायदेशीर कारवाई करणार, तोडफोडीमुळे झाले २ कोटींचे नुकसान!

कंगना BMC विरोधात कायदेशीर कारवाई करणार, तोडफोडीमुळे झाले २ कोटींचे नुकसान!

अभिनेत्री कंगना रनौतने ९ सप्टेंबरला मुंबई गाठली. त्यावेळी बीएमसीने (BMC) तिच्या कार्यालयाची तोडफोड केली. अशा परिस्थितीत कंगनाने नाराजी व्यक्ती करत एक व्हिडिओ शेअर केला. महाराष्ट्र सरकारने केलेल्या या कारवाईवर कंगनाने संतप्त भावना व्यक्त केली. याबाबत आज तक या वृत्तसंस्थेने कंगना रनौतचे वकील रिझवान सिद्दीकी यांच्याशी बातचित केली. यादरम्यान सिद्दीकी म्हणाले की, ‘कंगना सर्व गोष्टींवर नाराज आहे. तिचे कार्यालय हे एक तिचे स्वप्न होते. बीएमसीने कोणाच्या तरी सांगण्यावरून हे बेकायदेशीर पाऊल उचलले. कंगनाच्या ऑफिसमध्ये जितके नुकसान झाले आहे त्याची किंमत २ कोटी रुपये आहे. बीएमसीच्या या बेकायदेशी कारवाई विरोधात कंगनाने मुंबई हायकोर्टात एफिडेविट दाखल केले आहे. कंगना एक सामर्थ्यवान महिला आहे. बीएमसीच्या अधिकाऱ्यांविरोधात अभिनेत्री कंगना रनौत कायदेशीर कारवाई करेल.’

याच पार्श्वभूमीवर सध्या महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे. दरम्यान हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकुर यांनी या वादासंदर्भात म्हणाले की, ‘हिमाचलच्या मुलीचा अपमान आम्ही सहन करू शकत नाही. महाराष्ट्र सरकारने हिमाचलची मुलगी कंगना रनौतसोबत राजकीय सुडबुद्धीने अत्याचार केले. हे अत्यंत चिंताजनक आणि द्वेषपूर्ण आहे. आमचे सरकार आणि देशातील लोक या घटनेमध्ये हिमाचलची मुलगी कंगनासोबत उभे आहे.’

यासह भारतीय जनता पार्टी, करणी सेना, आरपीआई आणि आरएसएसपण उघडपणे कंगना रनौतला पाठिंबा देत आहेत. केंद्र सरकारने तिला मुंबईत येण्यासाठी ‘वाय’ सुरक्षा दिली आहे.


हेही वाचा – कंगना रनौतप्रकरणी राज्यपाल सरकारवर नाराज, केंद्राला अहवाल देणार


 

First Published on: September 10, 2020 5:26 PM
Exit mobile version