मेट्रोच्या बॅरिकेड्सला धडकून; एकाचा मृत्यू, २ जखमी

मेट्रोच्या बॅरिकेड्सला धडकून; एकाचा मृत्यू, २ जखमी

गोरेगावमधील मेट्रोच्या बॅरिकेट्सला स्कूल बस धडकून अपघात झाला. भरधाव वेगात असलेली ही स्कूल मेट्रोच्या बॅरिकेड्सला धडकल्याने हा अपघात झाला. या भीषण अपघातात दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून या अपघातात बस क्लीनरचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी सकाळी साडेसहा वाजता गोरेगाव पश्चिम द्रुतगती महामार्गावर घडला.

मेट्रोच्या बॅरिकेड्समुळे अपघात

गोरेगावमधील प्रतिथयश या खाजगी शाळेची बस घेऊन चालक-क्लीनर महामार्गावरून बस वेगाने निघाले होते. बसमध्ये शाळेचे विद्यार्थी असल्याने शाळेच्या वेळात विद्यार्थांना पोहचवण्याच्या नादात बसवरील चालकाचे नियंत्रण सुटले. महामार्गावरील मेट्रोचे काम सुरू असून अनेक ठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले होते. त्यातील एका बॅरिकेड्सवर जोरदार धडकली.

यावेळी बसचा क्लीनर उमेश गुरव हा बसच्या दारात उभा असताना त्याचा बॅरिकेड्समध्ये अडकला आणि गाडीत भरधाव वेगात असल्याने तो रस्त्यावर फेकला गेला. यामुळे हाताला आणि डोक्याला गंभीर इजा झाली. त्याला जवळील बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, परंतु उपचाराआधीच त्याचा जीव गेल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

सुरक्षितेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

रामजीत गौड या स्कुलबस चालकास वनराई पोलिसांनी अटक केली आहे. या स्कुलबसमध्ये इयत्ता सातवी ते नववीचे ३४ विद्यार्थी होते. या अपघातात बसची एक बाजू मेट्रोच्या बॅरिकेट्सला घासून दोन विद्यार्थी जखमी झाले. या विद्यार्थांना खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. या अपघातामुळे स्कूलबसच्या सुरक्षितेचा प्रश्न पुन्हा उपस्थितीत झाला आहे.

 

 

First Published on: March 20, 2019 9:07 AM
Exit mobile version