पोलीस निरीक्षकाकडून रशियन महिलेवर वारंवार बलात्कार

पोलीस निरीक्षकाकडून रशियन महिलेवर वारंवार बलात्कार

मुंबईच्या चेंबूर परिसरात राहणाऱ्या आणि मुळची रशियन असलेल्या एका महिलेने चेंबूर पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या पोलीस निरीक्षकाविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांनी आपल्यावर वारंवार बलात्कार केल्याचं म्हणत या महिलेने बलात्काराची तक्रार नोंद केली आहे. ही पीडित महिला मूळची रशियाची असून २००३ ला अभिनय क्षेत्रात काम करण्यासाठी मुंबईत आली होती. इमिग्रेशन कार्यालयात व्हिसा मुदतवाढीसंदर्भात तिची या पोलीस अधिकाऱ्याशी ओळख झाली होती. त्यानंतर गेली १२ वर्षे नशेच्या गोळ्या देऊन त्यांनी वारंवार बलात्कार केला असल्याचं या महिलेने तिच्या जबाबात म्हटलं आहे. पोलीस निरीक्षक सध्या पुण्यातील पिंपरी-चिंडवडच्या एका पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत.

हेही वाचा – डॉक्टर तरुणीवर बलात्कार आणि हत्या; आरोपीला फाशीची शिक्षा

रशियन महिला तीन वेळा गर्भवती

या पोलीस निरीक्षकाने वारंवार बलात्कार केल्याचा गुन्हा या महिलेने दाखल केला आहे. ही महिला २००४ मध्ये बॉलिवूडमध्ये नशीब आजमावण्यासाठी व्हीसीट व्हिसावर आली होती. पण, व्हीसाची मुदत संपल्यावर तिची गाठ पोलीस निरीक्षक अनिल जाधवशी पडली. अनिल जाधवने या महिलेचा बनावट पासपोर्ट बनवून दिला. त्यानंतर तो सातत्याने तिला धमकी देऊन बलात्कार करत होता असं त्या महिलेने आरोप केला आहे. रशियन महिला तीन वेळा गर्भवतीही राहिली. दोन वेळा महिलेचा गर्भपात करण्यात आला. महिलेला आरोपीपासून झालेला एक पाच वर्षांचा मुलगाही आहे. पोलीस निरीक्षक अनिल जाधवचा याआधीच विवाह झाला आहे. तक्रारदार रशियन महिला आणि तिच्या मुलाला अनिल जाधवने मारण्याचाही प्रयत्न केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर अनिल जाधवला निलंबित करण्यात आलं आहे.


हेही वाचा – वाशीमध्ये पुरुषावर सामूहिक बलात्कार करून केला शारीरिक छळ

First Published on: October 11, 2019 2:01 PM
Exit mobile version