घरमुंबईडॉक्टर तरुणीवर बलात्कार आणि हत्या; आरोपीला फाशीची शिक्षा

डॉक्टर तरुणीवर बलात्कार आणि हत्या; आरोपीला फाशीची शिक्षा

Subscribe

६ डिसेंबर २०१६ रोजी पहाटे तिचा मृतदेह तिच्या राहत्या घरी पोलिसांना तिच्या पालकांना सापडला होता.

विलेपार्ले येथील एका डॉक्टर तरुणीच्या घरात घुसून तिच्यावर बलात्कार करुन तिची नंतर हत्या केल्याप्रकरणी मुख्य आरोपी देवाशिष नंदलाल धार याला विशेष सेशन कोर्टाने फाशीसह जन्मठेप, दहा हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे. पीडित तरुणी ही विलेपार्ले परिसरात राहत असून ती व्यवसायाने डॉक्टर आहे. ६ डिसेंबर २०१६ रोजी पहाटे तिचा मृतदेह तिच्या राहत्या घरी पोलिसांना तिच्या पालकांना सापडला होता. ती विवस्त्र अवस्थेत घरी पडून होती. तिला जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

प्रियकराने प्रेयसीचा खून केला

शवविच्छेदन अहवालात तिच्यावर नैसगिक तसेच अनैसर्गिक लैंगिक अत्याचार झाल्याचे उघडकीस आले होते. विशेष म्हणजे तिची हत्या केल्यानंतर आरोपीने तिच्या मृत शरीरावर लैंगिक अत्याचार केले होते. त्यानंतर पुन्हा तिचा गळा आवळण्यात आला होता. पळून जाताना मारेकर्‍याने बाहेरुन कडी लावून पलायन केले होते. या घटनेनंतर विलेपार्ले पोलिसांनी अज्ञात मारेकर्‍याविरुद्ध हत्येसह बलात्काराचा गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली होती. स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी पळून गेलेल्या मारेकर्‍याचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असतानाच दोन महिन्यानंतर कोलकाता येथून देवाशिष धार याला विलेपार्ले पोलिसांनी संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले आहे. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. चौकशीत देवाशिष हा विलेपार्ले परिसरात राहत असून एका ज्वेलर्स दुकानात कामाला होता. श्रद्धा आणि देवाशिष हे दोघेही एकमेकांच्या परिचित होते. त्याचे श्रद्धावर प्रेम होते, मात्र तिचे इतर काही मित्र असल्याचे त्याला समजताच त्याच्या मनात तिच्याविषयी चीड निर्माण झाली होती. त्यातून या दोघांमध्ये नेहमी खटके उडत होते. त्यातून त्याने तिची हत्या केली होती.

- Advertisement -

सीसीटीव्हीमुळे आरोपी सापडला

एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो तेथून जाताना दिसत होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याच्याविरुद्ध विलेपार्ले पोलिसांनी आरोपपत्र सादर केले होते. या खटल्याची सुनावणी अलीकडेच पूर्ण झाली. यावेळी दिंडोशी विशेष कोर्टाने त्याला विविध कलमांतर्गत दोषी ठरविले होते. त्यापैकी हत्येच्या गुन्ह्यांत त्याला फाशीसह दहा हजार रुपयांच्या दंड, लैंगिक अत्याचारासह इतर कलमांतर्गत जन्मठेप तसेच पुरावा नष्ट केल्याप्रकरणी सात वर्षांच्या शिक्षेसह दहा हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे. या गुन्ह्यांचा तपास पोलीस निरीक्षक महादेव निंबाळकर यांनी केला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -