घरमुंबईवाशीमध्ये पुरुषावर सामूहिक बलात्कार करून केला शारीरिक छळ

वाशीमध्ये पुरुषावर सामूहिक बलात्कार करून केला शारीरिक छळ

Subscribe

फेरफटका मारण्यासाठी गेलेल्या पुरुषांवर पाच तरुण मुलांनी सामूहिक बलात्कार केल्या धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे परिसरात खळबळजनक वातावरण निर्माण झालं आहे.

वाशीत ३४ वर्षीय पुरुषावर पाच जणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जागृतेश्र्वर तलावाजवळ हा पीडित पुरुष फेरफटका मारण्यासाठी गेल्या होता. त्यादरम्यान पाच आरोपींनी त्याला कांदळवनात नेऊन त्याच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर या पाच तरुण आरोपींनी पीडित पुरुषाच्या पार्श्वभागात नारळाची अर्धवट करवंटी आणि कंडोम टाकून त्याचा छळ करून आरोपी फरार झाले. या घटनेमुळे परिसरात खळबळजनक वातावरण निर्माण झालं आहे. पीडीत पुरुषाला गंभीर जखमी झाल्यामुळे तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यावर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली असून त्याची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. या पाचही आरोपींविरोधात वाशी पोलिसांनी तक्रार नोंदवून आरोपींच्या शोध सुरू केला असून अद्यापही एकाही आरोपीला पकडण्यात पोलिसांनी यश आलेल नाही.

नक्की काय घडलं?

सोमवार सायंकाळी पीडित पुरुष हा नेहमीप्रमाणे जागृतेश्र्वर तलावाजवळ फेरफटका मारण्यासाठी गेला होता. तो मोबाइलवर बोलत फेरफटका मारत होता. त्याच दरम्यान २५ ते ३० वयोगटातील पाच तरुणांनी त्याला घेरले आणि जबरदस्ती उचलून कांदळवनाच्या झुडुपात नेऊन त्याच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्या पाच तरुण आरोपींनी पीडित पुरुषाच्या पार्श्वभागात नारळाची अर्धवट करवंटी आणि कंडोम टाकून तेथून ते फरार झाले.

- Advertisement -

या प्रकरणाची गंभीर प्रकारे दखल घेण्यात यावी

या सर्व भयानक प्रकारानंतर पीडित पुरुष जखमी अवस्थेत घरी गेला. मग त्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी कोपरखैरणे येथील खाजगी रुग्णालयात त्याला दाखल केलं. सर्व शस्त्रक्रिया होऊनही त्याची प्रकृती अद्यापही चिंताजनक आहे. या सर्व घटनेमुळे त्याच्या मित्रांनी पोलीस आयुक्त संजय कुमार यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्याच्या मित्रांनी लवकरात लवकर आरोपींनी पडकण्यात यावं तसंच या प्रकरणाची गंभीर प्रकारे दखल घेण्यात यावी याबाबत विनंती केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -