खासदार डेलकर यांच्या आत्महत्येप्रकरणी भाजपच्या भूमिकेची चौकशी करा – सचिन सावंत

खासदार डेलकर यांच्या आत्महत्येप्रकरणी भाजपच्या भूमिकेची चौकशी करा – सचिन सावंत

खासदार डेलकर यांच्या आत्महत्येप्रकरणी भाजपच्या भूमिकेची चौकशी करा - सचिन सावंत

मुंबईत काहीदिवसांपूर्वी दादरा नगर हवेलीचे खासदार मोहनभाई डेलकर यांनी आत्महत्या केली आहे. खासदार मोहनभाई मरिन ड्राईव्ह परिसरातल्या सी ग्रीन व्ह्यू हॉटेलमध्ये आत्महत्या केली. महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे प्रवक्ते सचिन सावंत हे दादरा खासदार मोहन देलकर यांच्या मृत्यूप्रकरणी भाजपच्या कथित भूमिकेची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना भेटून विनंती करणार असल्याचे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट करत म्हटले आहे की, मी लवकरच गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन दादरा नगर हवेलीचे खासदार मोहनभाई डेलकर यांच्या आत्महत्ये प्रकरणी भाजपच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी करणार आहे. अशा आशयाचे ट्विट सचिन सावंत यांनी म्हटले आहे.


हेही वाचा : दादरा नगर हवेलीचे खासदार मोहनभाई डेलकर यांची आत्महत्या


दादरा नगर हवेलीचे खासदार मोहनभाई डेलकर यांनी सोमवार (२२ फेब्रुवारी) दुपारी मुंबई मरिन ड्राईव्ह परिसरातल्या सी ग्रीन व्ह्यू हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांना घटनास्थळावरुन सुसाईड नोट मिळाली आहे. या प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिसांनी अपघातात मृत्यूची नोंद केली आहे. आत्महत्या करण्याचे कारण अस्पष्ट आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी खासदार डेलकर यांची आत्महत्या धक्कादायक असल्याचे म्हणत दुःख व्यक्त केले आहे. तसेच गृहमंत्र्यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, “दादरा नगर हवेली लोकसभा मतदारसंघातील सात वेळा निवडून आलेल्या खासदार देलकर यांच्या निधनाची बातमी अत्यंत धक्कादायक आहे.” असे ट्विट गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.

First Published on: February 23, 2021 3:40 PM
Exit mobile version