मुंबई, ठाण्यासह पालघर विभागाच्या अनेक एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत

मुंबई, ठाण्यासह पालघर विभागाच्या अनेक एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत

लॉकडाऊन काळात कामावर गैरहजर राहणाऱ्या कामगारांवर निलंबनाची कारवाई करू नये, तसेच कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत ठेवू नयेत, असे आदेश असताना सुद्धा एसटी महामंडळाने मुंबई, ठाणे आणि पालघर विभागातील अनेक कर्मचाऱ्यांचे एप्रिल महिन्याचे वेतन थकीत आहे. इतकेच नव्हे तर मध्यवर्ती कार्यालयातील अधिकाऱ्यांना पूर्ण पगार देण्यात आला आहे. तसेच राज्यातील इतर आगार व विभागांमधील कर्मचाऱ्यांना एसटीची सेवा बंद असताना पूर्ण महिन्याचा पगार देण्यात आला. मात्र मुंबई, ठाणे आणि पालघर विभागाच्या अनेक कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत आहे. त्यामुळे या तिन्ही विभागाच्या कर्मचाऱ्यांमध्ये एसटी महामंडळाविरोधात नाराजीचे वातारण आहे.

कोरोनामुळे गेली दोन महिन्यापासून राज्यातील एसटीचे चाकं थांबली होती. मात्र कोरोना विषाणू विरोधात लढाईत वैद्यकीय सेवा बजावणारे डॉक्टर्स, परिचारिका महापालिका, पोलीस, बँक, महाराष्ट्र शासन व इतर कर्मचारी अत्यावश्यक सेवेकरिता कार्यरत आहेत. ह्या सर्व अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मुंबई, ठाणे आणि पालघर या जिल्हयातून कर्तव्यावर येण्यासाठी व त्यांनतर पुन्हा घरी जाण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने बसेस अत्यावश्यक सेवा म्हणून चालविण्यात येत आहे. या विभागातील काही चालक व वाहकांना जितके दिवस कामावर हजर होते, तितक्याच दिवसांचे वेतन एसटी महामंडळाने दिले आहे.

दरम्यान, संपूर्ण महिना गैरहजर असलेल्या मध्यवर्ती कार्यालयातील अधिकाऱ्यांना पूर्ण पगार देण्यात आला आहे. कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी महामंडळाच्या दरबारात वेगवेगळा न्याय कसा? असा प्रश्नही संबंधित कर्मचाऱ्याने उपस्थित केला आहे. राज्यातील इतर आगार व विभागांमधील कर्मचाऱ्यांना एसटीची सेवा बंद असताना पूर्ण महिन्याचा पगार देण्यात आला. त्यामुळे जीवाची पर्वा न करता सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांवरील अन्याय दूर करावा, असे आवाहन कर्मचाऱ्यांनी परिवहन मंत्री व महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांना केले आहे.


सोशल डिस्टन्सिंग नसल्याने कर्मचाऱ्यांनीच रोखून धरली शटल
First Published on: June 1, 2020 8:59 PM
Exit mobile version