‘मोहन रावले शिवसेनेतला धगधगता निखारा’

‘मोहन रावले शिवसेनेतला धगधगता निखारा’

NCBने पुरवलेल्या गांजाच्या नशेत ते पडतील, ठाकरे सरकार नाही; राऊतांचा विरोधकांना इशारा

‘शिवसेना नेते, माजी खासदार मोहन रावले यांचे निधन झाल्याचे समजले. त्याचे जाणे धक्कादायक आहे. मोहन म्हणजे ज्यांनी शिवसेनेला जवळून पाहिलेला धगधगता निखारा. रावले हा परळ ब्रँडचा शिवसैनिक होता. त्यांनी पाच वेळा खासदारकीची निवडणूक जिंकली. पण, अखेरपर्यंत तो सगळ्यांसाठी मोहनच राहिला. तो तळागळातला शिवसैनिक होता’, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलतान दिली आहे.

गिरणी कामगारांचा मुलगा

‘मोहन रावले यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. नवीन पिढीने त्यांच्याकडून शिकावे. ते अनेकदा तरुंगातही गेले. त्यांच्या बोलण्यातून नेहमी शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे हेच कायम दिसले. मोहन कधीकाळी शिवसेनेचा एकमेव खासदार होता. गिरणी कामगारांचा मुलगा म्हणून तो अख्ख्या संसदेवर भारी पडायचा’.

सातत्याने केली पक्षाची सेवा

‘मोहन हा सामान्य माणसाचा चेहरा होता. तो केवळ मुंबईतच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रात ओळखला जायचा. सुरुवातीच्या काळात शिवसेनेच्या विद्यार्थी सेनेची जेव्हा स्थापना झाली तेव्हा त्याची सूत्रे मोहनकडे होती. त्या काळी विद्यापिठाच्या निवडणुका हा मोठा विषय होता. तेव्हा मोहनने सातत्याने मुंबई विद्यापिठावर शिवसेनेचा भगवा फडकत ठेवला. बाळासाहेब ठाकरेंसाठीची त्याची श्रद्धा वर्णन करता येणार नाही. सातत्याने त्यांनी पक्षाची सेवा केली. दोन दिवसांपूर्वीच माझं त्याच्याशी बोलणे झाले होते. काही कामासाठी तो गोव्यात गेला होता. आज त्याचे निधन झाले यावर विश्वास बसत नाही. मी त्याला विनम्र श्रद्धांजली वाहतो’, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.


हेही वाचा – मोहन रावले…आपला माणूस!


First Published on: December 19, 2020 12:45 PM
Exit mobile version