थंडीपासून बचावासाठी मोकाट कुत्र्यांना निवारा

थंडीपासून बचावासाठी मोकाट कुत्र्यांना निवारा

(मोकाट कुत्र्यांना थंडीत उब मिळावी यासाठी वसईत चिमुकल्यांनी निवारा बनवला आहे.) (फोटोः हनिफ पटेल)

वसई विरार परिसरात सध्या थंडीने सगळ्यांनाच हुडहुडी भरली आहे. त्याचा फटका मोकाट कुत्र्यांनाही बसला आहे. थंडीमध्ये कुडकुडणार्‍या कुत्र्यांना उब मिळावी यासाठी वसईतील बच्चेकंपनीने चक्के या कुत्र्यांसाठी उबदार निवारा बनविला आहे. त्या घरट्यात चार-पाच कुत्र्यांनी आता आश्रय घेतला आहे. चिमुकल्यांनी माणुसकीचे दर्शन घडवल्याने त्यांचा कौतुक केले जात आहे.

अचानक आलेल्या थंडीच्या लाटेने वसईकर गारठून गेले आहेत. त्यातून कुत्र्यांचीही सुटका झालेली नाही. आपल्या बिल्डींगच्या आवारात फिरणारी चार-पाच मोकाट कुत्री थंडीत कुडकुडत असल्याचे पाहून वसई पश्चिमेच्या आनंद नगर परिसरातील रचना बिल्डिंगमधील शुभम प्रधान, सोर्या प्रधान, ओमकार घराटे, मेहुल वेलंट्रा, मेरू करिया, अल्पा या 2 ते 6 वीच्या वर्गात शिकणार्‍या मुलांना वेदना झाल्या.

थंडीच्या कडाक्याने प्रत्येकजण गारठून जात आहे. अशावेळी ही मुकी मोकाट कुत्रीही थंडीत कुडकुडत असतील, असा मुलांना प्रश्न सतावत होता. त्यामुळे त्यांनी कुत्र्यांसाठी निवारा बनविला आहे.

First Published on: January 22, 2020 5:47 AM
Exit mobile version