विकास निधी वाटपावरून शिवसेना, भाजपात आरोप-प्रत्यारोप

विकास निधी वाटपावरून शिवसेना, भाजपात आरोप-प्रत्यारोप

विकास निधी वाटपावरून शिवसेना, भाजपात आरोप-प्रत्यारोप

मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पातील निधीचा वापर हा संपूर्ण मुंबईकरांसाठी सर्वपक्षीय नगरसेवकांच्या मार्फत करायला पाहिजे. मात्र सत्ताधारी शिवसेना विशेषतः स्थायी समिती अध्यक्ष भाजप विरोधात सूडबुद्धीने वागत आहेत. त्यामुळेच विकास निधी वाटपात अध्यक्षांनी भेदभाव करीत शिवसेनेला तब्बल ३४२ कोटी रुपये तर भाजपला १४२ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. त्यामुळे भाजपच्या नगरसेवकांच्या विभागातील विकासकामांवर त्याचा विपरीत परिणाम होणार आहे, असा आरोप करीत भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे, प्रभारी भालचंद्र शिरसाट यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी, सदर ६५० कोटी रुपयांच्या निधीचे समान वाटप करायला पाहिजे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. यशवंत जाधव यांनी, विकास निधीचा वापर चुकीच्या पद्धतीने केल्याचा आरोप भाजपचे पक्षनेते विनोद मिश्रा यांनी यावेळी केला. यशवंत जाधव यांनी, विकास निधीचा वापर वायफळ कामांसाठी केल्याने त्याबाबत आम्ही कॅगकडे तक्रार केली आहे, असे भालचंद्र शिरसाट यांनी सांगितले.

भाजपमुळेच मुंबईकरांचे नुकसान – यशवंत जाधव

मुंबईकरांचे नुकसान हे भाजपमुळेच होत आहे. भाजपने निधी वातपावरून चुकीचे आरोप करीत शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याने आयुक्तांनी निधीत कपात केली आहे, असा आरोप करीत स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी भाजपवर पलटवार केला आहे.


हेही वाचा – बिल्डरांनी अर्धवट सोडलेले प्रकल्प म्हाडा करणार पूर्ण


 

First Published on: March 3, 2021 10:07 AM
Exit mobile version