‘सरनाईक कुटुंबावरील ईडा-पिडा टळो’

‘सरनाईक कुटुंबावरील ईडा-पिडा टळो’

शिवसेनेचे आमदार आणि प्रवक्ते प्रताप सरनाईक यांचा क्वारंटाईन काळ पूर्ण झाला. त्यामुळे त्यांनी आज पुत्र पूर्वेशसह सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. यावेळी माध्यमांशी बोलताना प्रताप सरनाईक म्हणाले की, ‘जगावरचं कोरोनाचं संकट, देशावर असलेले शेतकऱ्याचं संकट आणि प्रताप सरनाईक कुटुंबियांवरील असलेली ईडा-पिडा टळो, अशा प्रकारचं गाऱ्हाणं सिद्धिविनायकाला घातला आहे.’

ईडीच्या समन्स संबंधित प्रताप सरनाईक म्हणाले….

‘बऱ्याच दिवसांपासून क्वारंटाईन असल्याने भेट होऊ शकली नाही. ईडीच्या नोटीस आल्या आहेत, त्यांना पत्राद्वारे उत्तरही दिलेलं आहे. भारतातील ही एक मोठी संस्था आहे. ईडीने अनेक आर्थिक घोटाळे आणि गैरव्यवहार उघड केले आहेत. त्यामुळे या संस्थेला मदत करणे आणि या संस्थेच्या प्रत्येक कामामध्ये सहकार्य करणे ही भूमिका प्रताप सरनाईकची कालही होती आणि आजही आहे आणि उद्याही राहिलं. त्यामुळे ज्या ज्या वेळेस ईडीच्या आधिकाऱ्यांनी बोलावले आहे, त्या त्या वेळेस मी त्यांच्या समोर ज्यांनी तयारी दर्शवली आहे. तशा प्रकारचे पत्र ही मी त्यांना दिलेलं आहे. व्हिडिओच्या माध्यमातून काही वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या येत असतील. परंतु माझं पत्र त्यांना पोहोचलं आहे आणि माझी सहकार्याची भूमिका कायम आहे. जेव्हा मी ईडीकडून वेळोवेळी मुदत मागितली त्यावेळेस ईडीच्या लोकांनी मला सहकार्य केलं आहे,’ असं प्रताप सरनाईक म्हणाले.

दिल्ली आणि महाराष्ट्राच्या लढाईत प्रताप सरनाईकांचा ‘तानाजी’

पुढे प्रताप सरनाईक म्हणाले की, ‘जेव्हा गेल्या कित्येक दिवसांपासून ईडीचे धाड सत्र सुरू झालं आहे, तेव्हापासून दिल्लीची आणि महाराष्ट्राची ही लढाई सुरू आहे. त्या लढाई संदर्भात प्रताप सरनाईक भविष्यात उत्तर देईलचं. दिल्ली आणि महाराष्ट्राच्या लढाईत प्रताप सरनाईकाचा ‘तानाजी’ झालेला आहे. परंतु तो तानाजी मालुसरे १६व्या शतकात होता आणि तानाजी मालुसरे २१व्या शतकातला आहे. ते तानाजी मालुसरे रयतेचे संरक्षण करताना धारातीर्थी पडले होते, पण प्रताप सरनाईक सक्षमपणे प्रत्येक गोष्टीला सामोर जाईल.’


हेही वाचा – दक्षिण मुंबई युवक काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी महिला बाजी मारणार?


 

First Published on: December 8, 2020 5:32 PM
Exit mobile version