दुर्गाडी किल्ल्यावर धार्मिक तणाव; पोलिसांचा वेळीच हस्तक्षेप

दुर्गाडी किल्ल्यावर धार्मिक तणाव; पोलिसांचा वेळीच हस्तक्षेप

दुर्गाडी किल्ला

बकरी ईद दिवशी दुर्गाडी किल्ल्याच्या परिसरात मुस्लिम बांधव नमाज पठण करतात. त्या काळात हिंदुंना दुर्गाडी किल्ल्यावरील दुर्गाडी मातेच्या मंदिरात घंटानाद आणि आरती करण्यास बंदी घालण्यात येते. दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवसैनिकांनी हातात भगवे ध्वज घेऊन दुर्गाडीवर चाल केली आहे. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप करुन त्यांना लालचौकी येथे रोखून धरले आहे.

कल्याण येथील दुर्गाडी किल्ल्यावर हिंदू आणि मुस्लिम समाजाची धार्मिक स्थळे असून, दोघांनीही आपले हक्क प्रस्थापित केले आहेत. बकरी ईदनिमित्त दोन धर्मांमध्ये कोणतेही वाद होऊ नये, यासाठी कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांकडून हिंदू समाजाला बकरी ईदच्या दिवशी दुर्गाडी किल्ल्यावर आरती आणि घंटानाद करण्याकरीता बंदी घालण्यात येते. याचा निषेध करण्यासाठी तत्कालीन ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली घंटानाद आंदोलनाची सुरूवात झाली. तेव्हापासून दरवर्षी बकरी ईदच्या दिवशी हे आंदोलन छेडले जाते. या दिवशी हा बंदीहुकूम मोडण्यासाठी शिवसैनिक दुर्गाडीवर चाल करतात. सोमवरीही शहरप्रमुख विश्वनाथ भोईर, महानगरप्रमुख विजय साळवी यांच्या नेतृत्वाखाली शिव सैनिकांनी आंदोलन छेडले त्यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.


हेही वाचा – त्याग, बलिदानाचे प्रतिक म्हणून साजरी करतात बकरी ईद


 

First Published on: August 12, 2019 1:37 PM
Exit mobile version