शस्त्राचा धाक दाखवून लुटणारा अटकेत

शस्त्राचा धाक दाखवून लुटणारा अटकेत

मुंबईतील वेगवेगळ्या परिसरात विद्यार्थ्यांकडून मदत मागून त्यांना शस्त्राचा दाखवून लुटणाऱ्या लुटारुला शिवाजी पोलिसांनी २४ तासात गजाआड केले आहे. मोहम्मद सबीर मोहम्मद मल्लू शेख (३०) असे या आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

असा लुटायचा विद्यार्थ्यांना

हा लुटारु वेगवेगळ्या शक्कल लढून महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना लुटायचा. मोहम्मद सबीर यांने वरळी येथे राहणाऱ्या चिराग जाधव या तरुणाला लुटल्याची घटना समोर आली आहे. चिराग हा तरुण दोन दिवसांपूर्वी मित्रांसोबत दादर येथून ट्युशन वरून घरी जात असताना काकांची वाट पहात माटुंगा रोड या ठिकाणी उभा होता. दरम्यान मोटरसायकल वरून मोहम्मद सबीर हा व्यक्ती त्याच्या जवळ येऊन थांबला. मोहम्मद यांनी आपल्याला काच खरेदी करायची आहे आणि त्यासाठी मला मदत करशील का अशी विचारणा केली. त्यानंतर चिरागने देखील मोहम्मद याला होकार दिला. त्यानंतर दोघे ही मोटारसायकलवर बसून जवळच्या एका काचेच्या दुकानात जाऊन त्याने काच विकत घेतली. दरम्यान चिराग हा काच मागे घेऊन बसला आणि दोघे माटुंगा रोड रेल्वे स्थानकावर आले. मोटारसायकलस्वाराने त्याला काचेसह रेल्वे ट्रॅक वर घेऊन आला आणि त्याने चिरागला शस्त्र दाखवून त्याला धमकी दिली. चिरागला शस्त्र दाखवत त्यांनी त्याच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून पोबारा केला.

याप्रकरणी घाबरलेल्या चिरागने घरी फोन करून झालेला प्रकार सांगितला. दरम्यान त्याच्या वडिलांनी चिरागसह शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. शिवाजी पार्क पोलिसांनी घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून मोटारसायकलचा क्रमांक मिळवला. मात्र अर्धवट क्रमांकामुळे पोलिसांना गाडीपर्यंत पोहचता येत नसल्यामुळे २५ मोटारसायकल मालकांची चौकशी करण्यात आली. अखेर त्यापैकी एक मोटारसायकल मिळून आली आहे. परंतु ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी ती मोटारसायकल अंटोप हिल येथे राहणारा मोहम्मद सबीर (३०) हा घेऊन गेला होता असे त्याने सांगितले. अखेर पोलिसांनी मोहम्मद सबीरला अटक करून त्यांने चोरलेली सोन साखळी हस्तगत केली आहे.


वाचा – पिंपरी – चिंचवडमध्ये चार वर्षीय चिमुरडीवर अत्याचार; आरोपी अटकेत

वाचा – मजुराच्या कुटुंबातील चिमुकलीवर लैंगिक अत्याचार

वाचा – जम्मू काश्मीरमध्ये ९ वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार

First Published on: October 27, 2018 3:11 PM
Exit mobile version