घरमहाराष्ट्रपिंपरी - चिंचवडमध्ये चार वर्षीय चिमुरडीवर अत्याचार; आरोपी अटकेत

पिंपरी – चिंचवडमध्ये चार वर्षीय चिमुरडीवर अत्याचार; आरोपी अटकेत

Subscribe

पिंपरी - चिंचवड परिसरात एका चार वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हे क्रूरकृत्य करणार आरोप तडीपार केलेला गुंड असून त्याला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

भूत आलं असं सांगून सराईत गुन्हेगाराने चार वर्षीय चिमुकलीला शेजारील निर्जंनस्थळी नेऊन बलात्कार केल्याची धक्कादायक घटना आज (बुधवारी) पिंपरी – चिंचवड येथे समोर आली आहे. मुलीवर ससून रुग्णालयात उपचार सुरू असून ती धक्क्यातून सावरल्यानंतर पोलीस तिचा जबाब घेणार आहेत, असे सांगितले जात आहे. पीडित मुलीने मैत्रिणीचे काका असल्याच्या दिलेल्या माहितीवरून उच्चाप्पा लिंगप्पा मंगळुर याला चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. उच्चाप्पा हा तडीपार गुंड असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सातत्याने घडताहेत बलात्काराच्या घटना

गेल्या पंधरा दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहरात मुलींवर अत्याचारांच्या घटनेत वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये संतापाची लाट आहे. आयुक्तालय होऊन काहीच उपयोग नसल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांमध्ये उमटत आहेत. अश्या घटना रोखण्यात पोलीस अपयशी ठरत असल्याचेही नागरीकांकडून म्हटले जात आहे.

- Advertisement -

पोलिसांनी योग्य कामगिरी पार पडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. अशा घटनांमध्ये जवळचा, ओळखीचा, नातेवाईक आणि शेजारीच राहणारा आरोपी असतो. अशा घटना सामाजिक जबाबदारी झालेली आहे. प्रबोधन होण्याची गरज आहे. आरोपी हे नात्यातीलच असल्याने पोलीस त्यांच्यावर संशय घेऊ शकत नाहीत.
– स्मर्तना पाटील, पोलीस उपायुक्त, पिंपरी-चिंचवड

असा आहे घटनाक्रम 

मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पीडित चार वर्षाची चिमुकली घरासमोर खेळत होती. तेव्हा आरोपी उच्चाप्पा लिंगप्पा मंगळुर याने भूत येईल, अशी भीती दाखवत पीडित मुलीला घरा जवळील झाडाझुडपात घेऊन जाऊन तिच्यावर बलात्कार केला. मुलगी बेपत्ता असल्याने तिचा शोध तिचे आई-वडिल घेत होते. मात्र मुलगी सापडत नसल्याने चिंचवड पोलिसात तक्रार वडील करण्यासाठी जाणार तेवढ्यात आईला मुलगी सापडली म्हणून फोन आला.

- Advertisement -

रुग्णालयात तातडीने केले दाखल 

धक्कादायक म्हणजे पीडित मुलीला घरी घेऊन आल्यानंतर तिचे अंतरवस्त्र नव्हते, तसेच गळ्यावर जखमा आढळल्या. वडिल मुलीला तातडीने शहरातील महानगर पालिकेच्या रुग्णालयात घेऊन गेले. तिथे त्यांना पुण्यातील ससून रुग्णालयात जाण्यास सांगितले. त्यांनी तातडीने जाऊन मुलीवर उपचार सुरू केले. परंतू पीडित मुलीवर बलात्कार झाल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट पसरली आहे. घटनेची माहिती रुग्णालय प्रशासनाने चिंचवड पोलिसांना दिली. त्याप्रमाणे त्यांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी उच्चाप्पा लिंगप्पा मंगळुर याला अटक केली.

आम्ही कामाला जातो मुलं घरी असतात,या घटनेमुळे भीती वाटत आहे. मुलं घराबाहेर खेळत असतात कामाला जायचं की मुलांवर लक्ष ठेवायचं. गेल्या २५ वर्षात अशी भयान घटना घडली नव्हती.
– पीडित मुलीच्या शेजारी राहणारी महिला

नागरीकांमध्ये संतापाची लाट 

आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याला १३ डिसेंबर २०१९ पर्यंत तडीपार केल्याची कारवाई यापूर्वीच चिंचवड पोलिसांनी केली होती. परंतु तो चार वेळा परिसरात फिरत असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती. मात्र आता चिमुरडीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून संतापाची लाट महिलांमध्ये आहे.

सराईल गुन्हेगार होता तडीपार 

दरम्यान, ही घटना घडून काही तास होत नाहीत तोपर्यंत सहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची आणखी एक धक्कादायक घटना समोर आली. मोहसीन शेख असं या नराधमाचे नाव असून निगडी पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. चिंचवडच्या दवाबाजार परिसरातील सोसायटीत ही घटना घडली. २९ सप्टेंबर २०१८ पूर्वी दोन ते तीन महिने हा प्रकार घडत होता. चॉकलेटचे आमिष दाखवून हा नराधम त्याच्या घरात मुलीला घेऊन जायचा आणि तिथं हे कृत्य करत असे. निगडी पोलीस स्टेशनमध्ये मंगळवारी रात्री हा गुन्हा दाखल झाला आहे.

पिंपरी-चिंचवडला पोलीस आयुक्तालय व्हावं यासाठी आम्ही आग्रही होतो, ते झालं देखील. मात्र शहरात सातत्याने अत्याचाराच्या घटना घडत आहेत. लौंगिक अत्याचाराच्या कायद्याप्रकरणी प्रबोधन करणार आहोत. एक महिन्यात चार्टशीट आणि तीन महिन्यात निकाल अशा प्रकारची पोलिसांनी भूमिका घ्यावी, याची माहिती मुख्यमंत्र्यांना देखील दिली आहे.”
– नीलम गोऱ्हे, शिवसेना नेत्या

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -