घरमहाराष्ट्रमजुराच्या कुटुंबातील चिमुकलीवर लैंगिक अत्याचार

मजुराच्या कुटुंबातील चिमुकलीवर लैंगिक अत्याचार

Subscribe

जळगावमध्ये मजूराच्या कुटुंबातील पाच वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलीस त्या नराधमाचा शोध घेत आहेत.

जळगावमध्ये एका पाच वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. एका मजूराच्या कुटुंबातील पाच वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे. पीडित तरुणीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असून याप्रकरणी पोलिसांनी समता नगरमधील राणा सिकंदर या संशयितास ताब्यात घेतले आहे.

नेमके काय घडले?

जळगावमधील कोल्हे हिल्स परिसरात राजा स्कूलजवळ माजी नगरसेवक संतोष पाटील यांच्या घराचे बांधकाम सुरु होते. हे बांधकाम करणारे मजूर त्या ठिकाणी असलेल्या हिल्स परिसरात राहत होते. हे सर्व कुटुंबीय रोजची कामे पूर्ण करुन रात्री घरी झोपण्यासाठी गेले. या कुटुंबातील सर्व सदस्य झोपल्यानंतर अचानक रात्री तीन वाजण्याच्या सुमारास मुलीचा रडण्याचा आवाज आला. रडण्याचा आवाज आल्याचे पाहून मुलीचे वडील आणि काका घराच्या बाहेर आले असता त्यांची चिमुकली रक्तबंबाळ झालेल्या अवस्थेत आढळून आली. चिमुरडीवर अज्ञात व्यक्तीने अत्याचार केला होता. चिमुरडीच्या वडिल आणि काकांनी नराधमाचा शोध घेतला. मात्र त्या ठिकाणी कोणीही सापडले नाही. पोलिसात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरुन पुरावे गोळा केले असून फॉरेन्सिक तज्ज्ञांची मदत घेणार आहेत.

- Advertisement -

चिमुरडीच्या वडिलांनचा जबाब

चिमुरडीच्या वडिलांनी दिलेल्या जबाबानुसार ते घाराचा दरवाजा नेहमीप्रमाणे आतून बंद करुन झोपले होते. मात्र दरवाजा कोणी उघडला याची माहिती नसल्याचे चिमुरडीच्या वडिलांनी सांगितले आहे. तसेच नराधमाने घरातील मोबाईल देखील चोरल्याचे सांगितले आहे.

वाचा – अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा गजाआड

- Advertisement -

वाचा – महिन्याकाठी दोन महिलांवर लैंगिक अत्याचार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -