सायन फ्लायओव्हर अखेर वाहतुकीसाठी खुला झाला

सायन फ्लायओव्हर अखेर वाहतुकीसाठी खुला झाला

सायन फ्लायओव्हर

सायन उड्डाणपुल हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत पहिला ट्रॅफिक ब्लॉक पुर्ण झाल्यानंतर आजपासून पुन्हा एकदा या मार्गावर वाहतुक सुरू झाली आहे. एमएसआरडीसीने पहिल्या ब्लॉकसाठी एक दिवसाचा अतिरिक्त कालावधी लागणार असल्याचे मुंबई पोलिसांना कळवले होते. त्यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना मोठ्या वाहतुक कोंडीचा सामना करावा लागला होता. पण काल मध्यरात्रीच पहिल्या ब्लॉकअंतर्गतचे काम पुर्ण झाल्याने आज सकाळपासून या फ्लायओव्हरवर वाहतूक सुरू झाली आहे.

सायन उड्डाणपुलाचे बेअरिंग बदलण्याचे काम 14 फेब्रुवारीला सुरू झाले होते. त्यामुळे उड्डाणपुलावरील दुतर्फा वाहतूक पूर्णत: बंद राहीली. पण बेअरींग बदलण्याच्या कामात अतिरिक्त वेळ लागल्यानेच हे काम एक दिवस आणखी वाढले.
वाहतुकीच्यादृष्टीने उड्डाणपुलाचे महत्त्व लक्षात घेता आठवड्यातील केवळ चार दिवस बेअरिंग बदलण्याचे काम करण्याचा एमएसआरडीसीने निर्णय घेतला होता. पण या काम पुर्ण होण्यासाठीचा कालावधी लागल्याने तसेच काही तांत्रिक अडचणींमुळे या ब्लॉकचा कालावधी वाढला.

अस होतय काम

मुंबई शहरात उड्डाणपुलाचे बेअरिंग बदलण्याचे काम पहिल्यांदाच मोठ्या स्तरावर होत आहे. याकारणाने, महामंडळाने हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी 300 मेट्रिक टन क्षमता असलेले जादा जॅक मागवले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून प्रत्यक्ष बेअरिंग बदलण्यासाठी आवश्यक पूर्वतयारी सुरु आहे. बेअरिंग बदलण्याच्या कामादरम्यान वाहतुकीचे नियोजन मुंबई वाहतूक पोलीस करणार आहेत. त्याचबरोबरीने वाहतूक पोलिसांना मदतीसाठी महामंडळाने 30 ट्रॉफिक वॉर्डन देखील दिले आहे. बेअरिंग बदलण्याचे काम पूर्ण झाल्यावर उड्डाणपुलाचे (Expansion Joint) बदलण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्याबरोबरच, डांबरीकरणाच्या कामाचा देखील समावेश आहे. या कामासाठी मात्र हा उड्डाणपुल वाहतुकीसाठी सलग 20 दिवस बंद ठेवण्याचे नियोजन आहे.

सायन फ्लायओव्हर दुरूस्तीसाठी एकूण आठ ट्रॅफिक ब्लॉक हाती घेण्यात येणार आहे. हे ब्लॉक मुंबई वाहतूक विभागाकडून मंजूर करण्यात आले आहेत.

ट्रॅफिक ब्लॉकचे वेळापत्रक

1. 14 फेब्रुवारी रात्री 10.00 वा. ते 17 फेब्रुवारी सकाळी 6.00 वाजेपर्यंत
2. 20 फेब्रुवारी रात्री 10.00 वा. ते 24 फेब्रुवारी सकाळी 6.00 वाजेपर्यंत
3. 27 फेब्रुवारी रात्री 10.00 वा. ते 2 मार्च सकाळी 6.00 वाजेपर्यंत
4. 5 मार्च रात्री 10.00 वा. ते 9 मार्च सकाळी 6.00 वाजेपर्यंत
5. 12 मार्च रात्री 10.00 वा. ते 16 मार्च सकाळी 6.00 वाजेपर्यंत
6. 19 मार्च रात्री 10.00 वा. ते 23 मार्च सकाळी 6.00 वाजेपर्यंत
7. 26 मार्च रात्री 10.00 वा. ते 30 मार्च सकाळी 6.00 वाजेपर्यंत
8. 2 एप्रिल रात्री 10.00 वा. ते 6 एप्रिल सकाळी 6.00 वाजेपर्यंत


हे ही वाचा – पत्रीपुलाचे गर्डर हैदराबादहून अखेर कल्याणात दाखल !

 


 

First Published on: February 18, 2020 8:00 AM
Exit mobile version