विलेपार्ले इंदिरानगर झोपडपट्टीमधील काही घरं कोसळली; अनेक जण अडकल्याची भिती

विलेपार्ले इंदिरानगर झोपडपट्टीमधील काही घरं कोसळली; अनेक जण अडकल्याची भिती

मुंबईतील विलेपार्ले परिसरातील इंदिरानगर 1च्या झोपडपट्टीमधील काही घर कोसळल्याची माहिती समोर येत आहे. रविवारी रात्री 8:28 वाजताच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती मिळते. विलेपार्ले पश्चिम येथील मिठीबाई महाविद्यालयाच्या शेजारी असलेल्या या झोपडपट्टीतील घरे कोसळ्याची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेतली. (Some houses in Vile Parle Indiranagar slum collapsed Many people are afraid of being trapped)

सद्यस्थितीत घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 2 गाड्या दाखल झाल्या आहेत. दरम्यान, या झोपडपट्टीमध्ये वस्ती मोठ्या प्रमाणात असल्याने रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. विलेपार्ले परिसरातील इंदिरानगर 1च्या झोपडपट्टीमधील काही घर कोसळली. त्यानंतर स्थानिकांनी पोलिसांना कळवले.

सध्या या ठिकाणी पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घरे कशामुळे कोसळली याचा तपास करत आहेत. शिवाय, या घटनेत अद्याप जीवितहानी झाल्याची माहिती मिळालेली नाही. मात्र, पोलीस अधिक तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, इंदिरानगर 1च्या झोपडपट्टी येथे तळमजला अधिक एक मजला असलेली घरे कोसळली. ही झोपडपट्टी नाल्याच्यानजीक आहे. घरं कोसळ्याने काही जण अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे. मात्र, या परिसरात घरे कोसळ्याने मातीचा ढिगारा मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे. सध्या माती हटवण्याचे काम सुरू असून, पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनेचा अधिक तपास करत आहेत.


हेही वाचा – औरंगाबादमधील PFI संघटनेचे कार्यालय फोडण्याचा मनसेसैनिकांकडून प्रयत्न; ‘ही कीड समूळ नष्टच करा…’, राज ठाकरेंचे आव्हान

First Published on: September 25, 2022 10:15 PM
Exit mobile version