औरंगाबादमधील PFI संघटनेचे कार्यालय फोडण्याचा मनसेसैनिकांकडून प्रयत्न; ‘ही कीड समूळ नष्टच करा…’, राज ठाकरेंचे आव्हान

पुण्यातील पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणाबाजीचे राजभरात पडसाद उमटताना दिसत आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबद्दल आक्रमक भूमिका घेतली आहे. औरंगाबादमध्ये किराडपुरा भागात मनसे सैनिकांनी PIF संघटनेचं कार्यालय फोडण्याचा प्रयत्न केला.

पुण्यातील पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणाबाजीचे राजभरात पडसाद उमटताना दिसत आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबद्दल आक्रमक भूमिका घेतली आहे. औरंगाबादमध्ये किराडपुरा भागात मनसे सैनिकांनी PIF संघटनेचं कार्यालय फोडण्याचा प्रयत्न केला. मनसे शहर उपाध्यक्ष अमित भांगे यांचा पी.एफ.आय.कार्यालयावर हल्ल्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येत आहे. (mns workers attempt to break office of pif organization in aurangabad raj thackeray)

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात पीएफआय या संघटनेवर देशभरात कारवाई करण्यात आली आहे. याचपार्श्वभूमीवर पुण्यात पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याच व्हायरल व्हिडीओची दखल घेऊन या घटनेच्या निषेधार्थ औरंगाबादमध्ये मनसेने PIF संघटनेचे कार्यालय फोडण्याचा प्रयत्न केला.

याबाबत शनिवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुकवर संबंधित व्हिडीओ शेअर करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे घोषणाबाजी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

“ही कीड समूळ नष्टच करा. तुमचा धर्म घ्या आणि पाकिस्तानात चालते व्हा. ही अटक कशासाठी झाली? तर दहशतवाद्यांना आर्थिक मदत करणे, त्यांची प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणे, ह्या गंभीर आरोपांखाली थोडक्यात देशद्रोही कृत्यांसाठी. तरीही ह्या देशद्रोह्यांचे समर्थन करत जर ह्या PFI च्या कार्यकर्त्यांना त्यांचा धर्म आणि पाकिस्तान आठवत असेल. तर तुमचा धर्म घ्या आणि पाकिस्तानात चालते व्हा. ही थेरं आमच्या देशात चालणार नाहीत”, असेही राज ठाकरे यांनी म्हटले.

औरंगाबादमध्ये पीएफआयच्या कार्यालयात घुसून मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. पण त्यावेळी पोलिसांनी मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पीएफआय आणि संबंधित आंदोलकांवर निशाणा साधला आहे.


हेही वाचा – काँग्रेस अध्यक्षपदासाठी शशी थरुरही निवडणूक लढवणार, अशोक गहलोत यांच्यासोबत टफ फाइट?