‘झाकीर नाईकच्या ५ मालमत्ता जप्त करा’

‘झाकीर नाईकच्या ५ मालमत्ता जप्त करा’

झाकीर नाईकच्या मुंबईतील पाच मालमत्ता जप्त होणार

राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएनं झाकीर नाईकच्या नाड्या आवळण्यास सुरूवात केली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या मुंबईतील कोर्टाने झाकीर नाईकच्या मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आता झाकीर नाईकच्या मुंबईतील माझगाव परिसरात असलेल्या पाच मालमत्ता जप्त करण्यात येणार आहेत. झाकीर नाईक २०१६ साली भारतातून पसार होऊन मलेशियामध्ये लपून बसला आहे. झाकीर नाईक वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू आणि इस्लामिक रिसर्च फाऊंडेशचा संस्थापक आहे.

कायदा करा,मगच झाकीर नाईकचे प्रत्यार्पण – मलेशिया

झाकीर नाईक विरोधातील फार्स आवळले

झाकीर नाईकला भारताच्या हवाली करू अशी भूमिका मलेशियानं काही महिन्यांपूर्वी घेतली होती. पण त्यानंतर मात्र मलेशिया सरकारनं माघार घेतली. प्रक्षोभक भाषणे करून दोन समाजात तेढ निर्माण करण्याच्या आरोपाखाली झाकीर नाईकवर सध्या कारवाईच्या पवित्र्यात तपास यंत्रणा आहेत. त्यामुळे झाकीर नाईक सध्या परदेशी पळाला आहे. पण त्याच्याविरोधात आता तपास यंत्रणांनी कारवाईचे फार्स आवळायला सुरूवात केली आहे. त्याच्याच एक भाग म्हणून झाकीर नाईकच्या माझगावमधील पाच मालमत्ता जप्त केल्या जाणार आहे.

झाकीर नाईकला भारतात पाठवणार नाही – मलेशिया

First Published on: October 12, 2018 9:27 PM
Exit mobile version