घरदेश-विदेशझाकीर नाईकला भारतात पाठवणार नाही - मलेशिया

झाकीर नाईकला भारतात पाठवणार नाही – मलेशिया

Subscribe

भारतातील कथित आंतकवादी कारवायासंदर्भात झाकीर नाईकला भारतात आणण्यासाठी भारताचे प्रयत्न चालू आहेत. मात्र, झाकीर नाईकला भारतात पाठवण्यात येणार नसल्याचं मलेशियाचे पंतप्रधान महातीर मोहम्मदनं स्पष्ट केलं आहे.

 

विवादास्पद मुस्लीम उपदेशक झाकीर नाईकला भारतात पाठवण्यात येणार नसल्याचं मलेशियाचे पंतप्रधान महातीर मोहम्मदनं स्पष्ट केलं आहे. भारतातील कथित आंतकवादी कारवायासंदर्भात झाकीर नाईकला भारतात आणण्यासाठी भारताचे प्रयत्न चालू आहेत. टेलिव्हिजनवर कट्टरपंथी उपदेश करणारा झाकीर नाईक २०१६ मध्ये भारत सोडून विदेशात गेला असून सध्या तो मलेशियामध्ये आहे. मलेशियामध्ये त्याला आसारा देण्यात आला.

- Advertisement -

मलेशियन पंतप्रधानांचा स्पष्ट नकार

भारतातील मीडियाच्या माहितीनुसार, भारतानं जानेवारीमध्ये झाकीरला सुपूर्द करण्याची मागणी केली होती. भारत आणि मलेशियामध्ये एक प्रत्यार्पण करार करण्यात आल्याचीदेखील बातमी देण्यात आली होती. मात्र क्वालालंपूरच्या बाहेरील पुत्रजयमध्ये एका संमलेनात विचारलेल्या प्रश्नावर मलेशियाच्या पंतप्रधानांनी झाकीरला भारताला सुपूर्द करण्यात नसल्याचं सांगितलं आहे. ‘जोपर्यंत झाकीर मलेशियामध्ये कोणतीही समस्या निर्माण करत नाही, तोपर्यंत आम्ही त्याला भारतात परत पाठवू शकत नाही. त्याला मलेशियाचं नागरिकत्व देण्यात आलं आहे. त्यामुळं त्याला परत पाठवण्यात येणार नाही.’ असं उत्तर महातीर यांनी दिलं आहे.

झाकीरवर आतंकवादी कारवाईचा आरोप

वृत्तामध्ये सांगण्यात आल्यानुसार, भारतानं नाईकला परत पाठवण्याची मागणी केली होती. तरूणांना आपल्या भाषणातून भडकवायचा प्रयत्न करून आतंकवादी कारवाईसाठी प्रवृत्त करण्याचा आरोप झाकीर नाईकवर आहे. मात्र झाकीर नाईकनं हे आरोप फेटाळून लावत भारतात परत येण्याची कोणतीही योजना नसल्याचं सांगितलं आहे. जोपर्यंत आपण सुरक्षित असून यासंदर्भात निष्पक्ष सुनावणी होत नाही तोपर्यंत आपण परत येणार नाही असं झाकीरनं स्पष्ट केलं आहे. तर २०१० मध्ये ब्रिटनमध्ये येण्यासाठी झाकीरवर कथित बंदी करण्यात आल्याचं वृत्त होतं. दरम्यान, नाईकच्या प्रत्यार्पणासंदर्भात अथवा त्याच्यावरील आरोपांसंदर्भात भारत अथवा मलेशिया दोन्हीकडील अधिकाऱ्यांकडून कोणतीही माहिती मिळालेली नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -