बळीराजाच्या जीवाशी खेळणाऱ्यांवर कडक कारवाई होणार; मुख्यमंत्र्यांच्या सूचना

बळीराजाच्या जीवाशी खेळणाऱ्यांवर कडक कारवाई होणार; मुख्यमंत्र्यांच्या सूचना

मुंबई : खरीप हंगाम अतिशय चांगल्या प्रकारे, उत्तम आणि यशस्वी शेतकऱ्यांचा जावा, तसेच बोगस बियाणे, बोगस खत मार्केटमध्ये आणण्याचे कृत्य करून बळीराजाच्या जीवाशी खेळणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. दादा भुसे यांच्यासोबत राज्यस्तरीय खरीप हंगाम बैठकीमध्ये एकनाथ शिंदे उपस्थित होते.

एकनाथ शिंदे म्हणाले की, येणारा खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. तो यशस्वीपणे गेला पाहिजे यासाठी योग्य अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामध्ये बियाणे, खत, किटकनाशक सर्व गोष्टींचा समावेश आहे. सध्याच्या हंगामात बिया आणि खते मुबलक प्रमाणात आहे. त्यामुळे कुठेही तुटवडा भासू दिला जाणार नाही. त्याचबरोबर यामध्ये गुणवत्ता सांभाळण्याच्या सूचना दिल्या आहेत. याचबरोबर बोगस बियाणे, बोगस खत मार्केटमध्ये आणण्याचे कृत्य करणाऱ्यांवर आणि बळीराजाच्या जीवाशी खेळणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. (Strict action will be taken against those who play with Baliraja’s life; Chief Minister’s Instructions)

एकनाथ शिंदे म्हणाले की, बळीराजाला जे-जे काही खरीप हंगामामध्ये आवश्यक आहे, त्याचे नियोजन योग्य प्रकारे आपल्या विभागाने केलेले आहे. कुठेही त्रुटी, उणीव भासणार नाहीत, असे नियोजन केलेले आहे. त्यामुळे जर का अलनिनोमुळे पाऊस थोडा पुढे गेला तर त्या प्रकारचे देखील मार्गदर्शन कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठ शेतकऱ्यांना करतील. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याची वेळ येणार नाही, अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत. अनेक उपाययोजना आहेत त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. शेवटी सरकार शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देणार आहे. म्हणून शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देणारं सरकार असल्यामुळे अनेक निर्णय शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये घेतलेले आहेत, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

ते म्हणाले की, अवकाळी पावासामुळे सतत होणारी नुकसान भरपाई, त्याचबरोबर ज्या काही योजना जसे की, पीक विमा, बँकेमधील कर्जाचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये न वळवता त्यांना आपण ज्या उद्देशासाठी देतो, त्यांना ते वापरता आले पाहिजे. यासाठी पीक विमा आता 1 रुपयामध्ये केला असल्यामुळे विमा कंपन्यानीही शेतकऱ्यांना अडचणी होतील असे निर्णय घेता कामा नये आणि बँकांनीही त्यांना वेळेवर कर्ज दिले पाहिजे, अशा सूचना दिलेल्या आहेत. एकंदरीत सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा आहे. त्यांच्या हिताला प्राधान्य देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. त्यामुळे आजच्या राज्यस्तरीय खरीप हंगाम बैठकीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचे सादरीकरण झाले आहे, सूचनाही आल्या आणि त्याचे योग्य असे नियोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना या सर्व नियोजनानंतर कुठलीही अडचण होता कामा नये, अशा प्रकारचे सरकारचे धोरण आहे, हे सराकर बळीराजाचं सरकार आहे, अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी मांडली.

 

First Published on: May 24, 2023 3:35 PM
Exit mobile version