महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांसह उपनगरीय रुग्णालयांना टेलिमेडिसीनद्वारे जोडणार

महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांसह उपनगरीय रुग्णालयांना टेलिमेडिसीनद्वारे जोडणार

प्रातिनिधीक फोटो

मुंबई महापालिकेच्या उपनगरीय रुग्णालयांमध्ये चिंताजनक असलेल्या रुग्णालयांमध्ये बऱ्याचदा प्रमुख रुग्णालयांमध्ये पाठवले जाते. परंतु आता प्रमुख रुग्णालयातील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, उपनगरीय रुग्णालयांमध्येच टेलिमेडिसीनद्वारे उपचार केले जाणार आहे.  मुंबई महापालिकेच्या चार प्रमुख रुग्णालयांसह १६ उपनगरीय रुग्णालयांमध्ये आता टेलिमेडिसीनची सुविधा राबवली जाणार आहे.

टेलिकम्युनिकेश आणि माहिती तंत्रज्ञानाच्या वापर करून टेलिमेडिसीनद्वारे कितीही दूर अंतरावर असलो तरी वैद्यकीय आरोग्य सेवा पुरवता येते. या सुविधा अंतराचा अडथळा दूर करते आणि  गरजू रुग्ण तसेच जेथे वैद्यकीय सेवा पोहोचू शकत नाही, अशा ठिकाणी टेलिमेडिसीनद्वारे वैद्यकीय इंमेजिंग आणि आरोग्य विषयक माहिती अशी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करणे शक्य आहे.

अत्यंत निकडीच्या प्रसंगी आणि चिंताजनक परिस्थितीत रुग्णाला हलवू शकत नाही आणि विशेष सल्ला उपलब्ध होवू शकत नाही. अशा वेळी या सेवा प्रणालीचा वापर करता येतो. तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यासाठी रुग्णांना अन्यत्र हलवण्याची गरज नाही व त्यामुळे प्रवास खर्च वाचतो. तसेच तज्ज्ञ डॉक्टरांचा होणारा अनावश्यक प्रवासही वेळही कमी होतो. त्यामुळे महापालिकेच्या पूर्व व पश्चिम उपनगरीय रुग्णालयांमध्ये आणि केईएम, शीव, नायर आणि कुपर रुग्णालयांमध्ये टेलिमेडिसीन इन्फ्रास्टक्चर उभारुन टेलिमेडिसीन सुविधा पुरवण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. यामध्ये चार प्रमुख रुग्णालये ही स्पेशालिस्ट नोड्स तर १६ उपनगरीय रुग्णालये ही पेशंट नोट्स रुग्णालये असणार आहेत.

टेलिमेडिसीनची सुविधा ही दोन वर्गवारीत आहे. रिअल टाईम किंवा सिक्रोनाईज अर्थात ऑनलाईन आणि दुसरी स्टोर अँड फॉरवर्ड टेलिमेडिसीन किंवा असिक्रोनाईज पध्दतीने राबवता येते. या सुविधेतंर्गत दोन डॉक्टरांच्या रुग्णाच्या वैद्यकीय समस्येबाबत आयटी बेस हार्डवेअर व सॉफ्टवेअरचा उपयोग करून टेलिकम्युनिकेशन नेटवर्कच्या सहाय्याने रिअल टाईम वैद्यकीय चर्चा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे करू शकतो.

तीन कंपन्या तांत्रिक बाबींमध्येच बाद

या कामासाठी महापालिकेने मागवलेल्या निविदांमध्ये धनुष इन्फोटेक, डायनॉकॉन सिस्टीम अँड सोल्यूशन्स, ई.वैद्य प्रायव्हेट लिमिटेड आणि मॅसस्ट्रोस इलेक्ट्रॉनिक्स अॅड टेलिकम्युनिकेशन सिस्टीम या चार कंपन्यांनी  भाग घेतला होता. परंतु चारमधील मॅसस्ट्रोस इलेक्ट्रॉनिक्स अॅड टेलिकम्युनिकेशन सिस्टीम वगळता उर्वरीत तीन कंपन्या तांत्रिक बाबींमध्ये बाद ठरल्या. अपुरी कागदपत्रे व तांत्रिक बाबींचे स्पष्टीकरण न दिल्याने त्या तीनही कंपन्यांना बाद करण्यात आले. त्यामुळे एकमेव असलेल्या मॅसस्ट्रोस इलेक्ट्रॉनिक्स अॅड टेलिकम्युनिकेशन सिस्टीम या कंपनीला पात्र ठरल्याने त्यांना ९ कोटी १० लाख रुपयांचे कंत्राट देण्यात येत आहे.

विशेष म्हणजे स्पर्धात्मक निविदा करण्यासाठी तीन निविदाकारांनी भाग घेणे आवश्यक आहे. परंतु याठिकाणी तीन कंपन्यांनी भाग घेतला असला तरी त्या बाद ठरल्याने त्यांनी कितीची बोली लावली ही बाब समोर आलेली नाही. त्यामुळे या एकमेव कंपनीला काम देण्याचा प्रयत्न होत असल्याने हे काम वादात अडकण्याची दाट शक्यता आहे.


देशात २४ तासांत ५४ हजारांहून अधिक कोरोनाचे नवे रूग्ण; मात्र Active रूग्णांच्या संख्येत घट

First Published on: October 21, 2020 2:24 PM
Exit mobile version