भिन्न रक्तगटाच्या ११ महिन्याच्या बाळावर यकृत प्रत्यारोपण!

भिन्न रक्तगटाच्या ११ महिन्याच्या बाळावर यकृत प्रत्यारोपण!

मुंबईतील परळच्या ग्लोबल हॉस्पिटमध्ये एका ११ महिन्याच्या बाळावर यशस्वी यकृत प्रत्यारोपण करण्यात आलं आहे. रक्तगट जुळत नसतानाही अशा प्रकारे शस्त्रक्रिया करणं ही एक दुर्मिळ घटना मानली जात आहे. पश्चिम भारतातील पहिलीच यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. परळ, मुंबई येथील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये डॉ. रवि मोहनका आणि डॉ. अनुराग श्रीमल यांच्या नेतृत्वाखाली विशेष बालरोग यकृत प्रत्यारोपण टीमने ११ महिन्यांच्या ५.५ किलो वजनाच्या बाळामध्ये भिन्न रक्तगटाचे यकृत प्रत्यारोपण केले आहे. या यशस्वी शस्त्रक्रियेला एबीओ विसंगत रक्त संक्रमण म्हणून ओळखलं जातं. हर्षिता हिला बिलीरी अॅट्रेसियाचे निदान झाले. सुरुवातीच्या शस्त्रक्रियेनंतरही तिचे यकृत अकार्यक्षम ठरले. त्यामुळे, तिला यकृत प्रत्यारोपण करणं गरजेचं होतं. पण, तिच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचे यकृताचे नमुने जुळत नव्हते त्यामुळे यकृत प्रत्यारोपणास विलंब झाला होता. दिवसेंदिवस हर्षिताची प्रकृती चिंताजनक होत असल्याने यकृत प्रत्यारोपण करणे अधिक गरजेचं होतं.

याविषयी परळच्या लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जन यांनी डॉ. रवि मोहनका सांगितलं, “यकृत प्रत्यारोपणापूर्वी बाळावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतरही तिला शरीरात कावीळ, वजन कमी होणे, पोटात द्रवपदार्थ येणे, उलट्या होणे आणि अतिदक्षता विभागात न्यावे लागणे या गोष्टी निदर्शनास आल्या. यासाठी तिला बरे होण्यास फक्त त्वरित यकृत प्रत्यारोपण करणे गरजेचे होते. कोणत्याही यकृत प्रत्यारोपणासाठी, रक्तदात्याचा आणि प्राप्तकर्त्याचा रक्त गट जुळला पाहिजे. पण, हर्षिताने आपल्या कुटुंबात रक्तदात्याशी जुळणारा योग्य रक्त गट घेतला नाही. मर्यादित कालावधी उपलब्ध आणि दातांच्या अनुपस्थितीमुळे यकृत प्रत्यारोपण हर्षितासाठी एक अशक्य कामासारखे दिसत होते.”

बालरोग यकृत प्रत्यारोपण शल्यचिकित्सक डॉ. अनुराग श्रीमल यांनी सांगितलं, “आम्ही यापूर्वी ज्येष्ठांमध्ये अशा प्रकारची शस्त्रक्रिया केली होती. परंतु एका बाळासाठी अशी शस्त्रक्रिया ही आमची पहिली वेळ होती. या व्यतिरिक्त हर्षितालाही इतर मोठी आव्हाने होती जसे तिचे वय १ वर्षापेक्षा कमी होते आणि वजन फक्त ५.५ किलो होते. तिच्या कुटुंबियांना परिस्थितीची पूर्वकल्पना आणि अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया आव्हानात्मक असल्याचे माहीत होते. हर्षिताच्या वडिलांचा बी रक्तगट आहे. ते आपल्या यकृताचा एक छोटासा भाग तिला दान देण्यासाठी पुढे आले.”

First Published on: December 7, 2019 10:16 PM
Exit mobile version