उन्हाळ्यात आईस्क्रीम खा, पण जपून… बाजारात डालड्याचे आईस्क्रीम

उन्हाळ्यात आईस्क्रीम खा, पण जपून… बाजारात डालड्याचे आईस्क्रीम

आईस्क्रिम जपून खा

उन्हाळा असो , पावसाळा किंवा हिवाळा असो प्रत्येकालाच आईस्क्रीमचा मोह आवरता येत नाही. तसेच, सध्या मुंबईचे तापलेले वातावरण पाहता मुंबईकरांना थंड खाण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. त्यातच जर आईस्क्रीम खात असाल तर थोडे जपून खा. कारण, आईस्क्रिमध्ये दूधाऐवजी वनस्पतीचा म्हणजेच डालड्याचा वापर केला जात असल्याचे उघड झाले आहे.

बाजारात अनेक वेगवेगळ्या फ्लेव्हर्समध्ये उपलब्ध होणाऱ्या व्हेनिला, स्ट्रोबेरी या आईस्क्रीमवर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच तुटून पडतात. पण, राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनाने नुकत्याच एका कारवाईत वनस्पती वापरलेल्या आईस्क्रीमवर कारवाई केली आहे.

काय सांगतो फूड सेफ्टी अॅक्ट?

फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडियाच्या (FSSAI) मानांकनानुसार, आईस्क्रीम हे दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांचा वापर करून बनवले जाते. जर वनस्पती तेल, आर्टिफिशिअल स्विटनर यांचा वापर केला जात असेल, तर ते आईस्क्रीम नाही ते फ्रोजन डिजेर्ट असते. पण, उन्हाळ्यात आईस्क्रीमची वाढती मागणी पाहता वनस्पती तेलाचा वापर करून फ्रोजन डिजेर्ट तयार केले जात आहे आणि ते आईस्क्रीम म्हणून विकले जात आहे.

२७ हजार रुपयांचा साठा जप्त

राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) मुंबईत केलेल्या कारवाईत तब्बल २७ हजार रुपयांचा साठा जप्त केला आहे. एफडीएच्या अन्न विभागाचे सह-आयुक्त शैलेश आढाव यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक आयुक्त मुळे, एल.एस.शेवाळे आणि अविनाश दाभाडे यांनी वडाळा परिसरात ही कारवाई केली आहे.

आईस्क्रीममध्ये दूधाऐवजी डालडा

उन्हाळा सुरू झाला की आईस्क्रीम सारख्या थंड पदार्थांची मागणी वाढते. या दरम्यान, विक्रेते किंवा कंपन्या वनस्पतीचा वापर केलेले आईस्क्रीम तयार करत आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. आईस्क्रीममध्ये डालडा म्हणजेच वनस्पती घालून विकले जात होते. ११ तारखेला वडाळा परिसरमध्ये ही कारवाई केली आहे. आईस्क्रीममध्ये दोन प्रकार आहेत. एक आईस्क्रीम आणि दुसरे फ्रोजन डेजर्ट. आईस्क्रीममध्ये दूग्धजन्य पदार्थ वापरतात आणि फ्रोजन डेजर्टमध्ये वनस्पती वापरले जाते. आईस्क्रीममध्ये दूधाऐवजी डालडा घालून विक्री होत होती. वडाळ्याच्या साईनाथ इंडस्ट्री, भारत इंडस्ट्रियल इस्टेट या कंपन्यांवर छापे टाकले. याठिकाणी तपासणी केली असता स्ट्रॉबेरी आणि व्हॅनिला आईस्क्रीम तयार करताना वनस्पती तेलाचा वापर केला गेला. एफडीएने २७ हजार ५८६ रुपयांचा आईस्क्रीमचा साठा जप्त केला आहे आणि संबंधितांवर गुन्हा दाखल केला आहे.  – शैलेश आढाव, अन्न विभागाचे सह-आयुक्त, एफडीए

First Published on: April 17, 2019 7:00 AM
Exit mobile version