लॉकडाऊन उठवा आम्हाला गटारी साजरी करून द्या, तळीरामांची मागणी!

लॉकडाऊन उठवा आम्हाला गटारी साजरी करून द्या, तळीरामांची मागणी!

alcohol party

राज्यभरात साजरी होणारी गटारी अमावस्या म्हणजे तळीरामासाठी एकप्रकारची पर्वणीच असते. या एका दिवशी भरपूर मद्य प्यायचे आणि मोठ्या प्रमाणात मांसाहार करायचा हे तळीरामांचे ठरलेले असते. मात्र लॉकडाऊनमध्ये गटारी साजरी कशी करायची हा प्रश्न ठाणे जिल्ह्यातील तळीरामांना पडला आहे. गटारीच्या दिवशी सरकारने लॉकडाऊन उठवून दुकाने सुरु करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी आता तळीरामांकडून होत असल्याचे समजते आहे.

ठाणे जिल्हयातील अनके महानगरपालिकेच्या हद्दीत १९ जुलै पर्यंत कडक लॉकडाऊन सुरु आहे. दूध आणि औषधांची दुकाने वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश महानगरपालिकेकडून देण्यात आलेला आहे. कल्याण डोंबिवली महानगर पालिकेने तर भाजीपाला विक्री, चिकन मटणाची दुकाने बंद ठेवण्याचा आदेश जारी केला आहे. मद्य विक्री ते देखील घरपोच सेवा देण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. १९ जुलै रोजी लॉकडाऊनची कालावधी पूर्ण होत असून दुसऱ्याच दिवशी सोमवारी गटारी अमावस्या आहे. मात्र सोमवार असल्यामुळे गटारी अमावस्या रविवारीच अनेकांकडून साजरी कऱण्यात येणार आहे.

१९ जुलै रोजी लॉकडाऊनचा कालावधी संपणार आहे, पुन्हा लॉकडाऊन वाढवू नये किंवा रविवारी एक दिवस तरी लॉकडाऊन शिथिल करण्यात यावा, अशी मागणी तळीरामांकडून करण्यात येत आहे.

गटारी अमावस्याच्या दिवशी आम्ही कामावर देखील जात नाही, त्या दिवशी आम्ही सर्व मित्र मंडळी गात्री साजरी करीत असतो यावेळी मात्र करोनाच्या संकटामुळे मित्रांना एकत्र बसता येणार नसल्याचे दुःख तर होत आहे. परंतु सोशल डिस्टनिग पाळले पाहिजे म्हणून यंदाची गटारी अमावस्या कुटुंबासोबत साजरी करू परंतु सरकारने त्या दिवशी पुन्हा लॉकडाऊन वाढवू नये असे कल्याणमध्ये राहणारे ५२ वर्षीय एकनाथ शेलार यांचे म्हणणे आहे.

श्रावण सुरु होतोय या महिन्यात मास मटण खाता येत नसल्यामुळे श्रावण सुरु होण्याच्या आदल्या दिवशी अमावस्येला मनसोक्त मासमटण खातो, परंतु डोंबिवलीत लॉकडाऊन मध्ये सर्वच बंद असल्यामुळे मास मटण. मासे मिळणार नसल्यामुळे यंदाची गटारी अमावस्या कडधान्यावरच साजरी करावी लागणार कि काय असा प्रश्न डोंबिवलितील रामदास पाटील यांना पडला आहे, सरकारने पुन्हा लॉकडाऊन घोषित करू नये, असे मत पाटील यांनी मांडले आहे.


ऐश्वर्या राय बच्चन मुलीसह नानावटी रुग्णालयात दाखल

First Published on: July 17, 2020 11:18 PM
Exit mobile version